महा.लोकसंवाद न्यूज
प्रतिनिधी वरणगाव ता.भुसावळ
आज दिनांक 11 एप्रिल रोजी आचेगाव येथे महात्मा जोतिबा फुले यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
याबाबत सविस्तर माहिती अशी आज दिनांक 11 एप्रिल रोजी संपुर्ण भारतात क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले हे महाराष्ट्रातील एक मोठे समाजसुधारक विचारवंत आणि लेखक होते त्यांनी सामाजिक प्रबोधन जातिभेद आणि अस्पृश्यता याविरुद्ध मोठे कार्य केले त्यांनी महिला आणि मागासलेल्या जातीच्या शिक्षणासाठी विशेष योगदान दिले त्या महामानवाची आज जयंती साजरी करण्यात येते त्या अनुषंगाने आज भुसावळ तालुक्यातील आचेगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये महात्मा फुले यांची जयंती साजरी करण्यात आली
यावेळी येथे उपस्थित ग्रामसेवक महेंद्र तायडे साहेब तसेच सामाजिक कार्यकर्ते आशिष चौधरी अक्षय माळी कमलाकर माळी कॅम्पुटर ऑपरेटर नेहा मॅडम तसेच ग्रामपंचायत शिपाई अरुण चौधरी पत्रकार प्रकाश सुरवाडे व मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते

No comments:
Post a Comment