भुसावळ (प्रतिनिधी) - भुसावळ नगरपरिषदेच्या सफाई कामगारांच्या विविध प्रकारच्या न्याय व हक्कांच्या प्रलंबित मागण्यांबाबत दिनांक १०/०६/२०२५ पासुन अखिल भारतीय सफाई कामगार संघटना प्रदेश सचिव संतोष थामेत यांचे आमरण उपोषण सुरू होते आज दिनांक १५/०६/२०२५ रोजी सामाजिक कार्यकर्ते विनोद सोनवणे यांनी भेट दिली व मा. अॅड. धर्मपाल मेश्राम साहेब सदस्य अनुसूचित जाती जमाती आयोग, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष व भुसावळ नगरपरिषद मुख्याधिकारी राजेंद्र फातले साहेबांशी मोबाईल वर मागण्या संदर्भात माहिती दिली व उपोषण कर्ते संतोष थामेत यांच्या शी सदस्य अनुसूचित जाती जमाती आयोग, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष अॅड धर्मपाल मेश्राम यांची चर्चा घडवून आणली मा. अॅड. धर्मपाल मेश्राम साहेब सदस्य अनुसूचित जाती जमाती आयोग, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष यांनी दिनांक १९/०६/२०२५ ला मुंबई येथे उपोषण कर्त्यांची व भुसावळ नगरपरिषद मुख्याधिकारी यांची बैठक घेऊन मागण्या संदर्भात योग्य निर्णय घेऊ असे आश्वासन दिले व मुख्याधिकारी यांनी उपोषण कर्त्यांना मागण्या संदर्भात सकारात्मक लेखी दिल्यानंतर अखिल भारतीय सफाई कामगार संघटना प्रदेश सचिव संतोष थामेत यांनी उपोषण स्थगित केले याप्रसंगी अखिल भारतीय सफाई कामगार संघटना जिल्हाध्यक्ष राकेश बारसे, जिल्हा उपाध्यक्ष विजय तेजकर,जिल्हा महासचिव नरेश बिऱ्हाडे, बंटी नरवाडे , शहराध्यक्ष मयुर सुरवाडे ,राजेश वानखेडे ,मिलींद सोनवणे, गौरव नन्नवरे
यांनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले यावेळी सफाई कामगार महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:
Post a Comment