पुरनाड येथे वीज पडून एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू – आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आर्थिक मदत प्रदान - MHL News

Breaking

Monday, 16 June 2025

पुरनाड येथे वीज पडून एका नागरिकाचा दुर्दैवी मृत्यू – आमदार चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आर्थिक मदत प्रदान

 




प्रतिनिधी ( मुक्ताईनगर)


दि. १४ जून रोजी सायंकाळी मौजे पुरनाड, ता. मुक्ताईनगर येथे विजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसात श्री शांताराम शंकर कठोरे (वय ४५) यांचा दुर्दैवी मृत्यू वीज पडल्याने झाला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली होती.


 दिवंगत व्यक्तीच्या कुटुंबीयांना शासनामार्फत नैसर्गिक आपत्ती अंतर्गत ₹ ४,००,०००/- आर्थिक मदतीचा धनादेश

मा. आमदार मुक्ताईनगर श्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.


याप्रसंगी तहसीलदार श्री. गिरीश वखारे यांचीही उपस्थिती होती.

No comments:

Post a Comment