आषाढी एकादशी निमित्त संस्कृती माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे वारी काढण्यात आली - MHL News

Breaking

Saturday, 5 July 2025

आषाढी एकादशी निमित्त संस्कृती माध्यमिक विद्यालय, जळगाव येथे वारी काढण्यात आली

 



महा लोकसंवाद न्यूज 

प्रतिनिधी*(जळगाव)


मेहरुण, जळगाव* येथे आज दिनांक : 6 जुलै 2025 रोजी आषाढी एकादशी निमित्त पंढरीची वारी साजरी करण्यात आली. 


मा.महापौर सौ.जयश्रीताई महाजन यांनी पालखिचे पूजन केले. शालेय परिसरातून टाळ मृदुंगाच्या गजरात वारकरी व दिंडी काढण्यात आली, तसेच शैक्षणिक गीतांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी परिसरातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटवून दिले. या माध्यमातून वारकरी सांप्रदायाविषयी माहिती देण्यात आली. 


यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रूख्मिनी, संतांच्या आकर्षक वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर चिमूकले बालगोपालांनी विठ्ठल नामाचा जप करीत संपूर्ण परिसर भक्तीमय केला.


 प्रसंगी मुख्याध्यापका सौ. डी.सी. येवले मॅडम यांचे मार्गदर्शन* लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच विद्यार्थी सर्वांनी परिश्रम घेतले

No comments:

Post a Comment