समाजसेवक विनोद सोनवणे व भुसावळातील गोल्डर अवर रुग्णालयाचा संयुक्त उपक्रम : मंत्री संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती
भुसावळ (3 सप्टेंबर 2025) : शहरातील पंचशील नगरातील नागरिकांसाठी मोफत भवय आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन गुरुवार, 4 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30 ते दोन या वेळेत करण्यात आले आहे. भुसावळ शहरातील आनंद नगरातील गोल्डन अवर हॉस्पीटलच्या तज्ज्ञ डॉक्टरांतर्फे तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहेत. या शिबिराच्या अध्यक्षस्थानी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे असतील.
नागरिकांची होणार मोफत आरोग्य तपासणी
आरोग्य शिबिरात रक्तदाब (बी.पी.), डायबीटीस (शुगर), कार्डीओग्राम (ईसीजी) तपासणी मोफत करण्यात येईल शिवाय मोफत औषधोपचारासह आरोग्याविषयी डॉ.सांतनू कुमार साहू व सहकारी डॉक्टर्स यावेळी मार्गदर्शन करतील.
मंत्र संजय सावकारे यांची प्रमुख उपस्थिती
मोफत आरोग्य शिबिराच्या अध्यक्षस्थानी वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे असतील. यावेळी माजी प्रभारी नगराध्यक्ष विजय चौधरी, समाजसेवक नितीन धांडे, राज विजय चौधरी, दिनेश इखारे आदींची उपस्थिती राहणार आहे.
पंचशील नगरातील तिरंगा चौक, शर्मा हॉस्पीटलजवळ गुरुवारी सकाळी 9.30 ते 2 या वेळेत होार्या मोफत आरोग्य शिबिराचा पंचशील नगरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक व ब्ल्यू स्टार क्रीडा मंडळाचे अध्यक्ष विनोद सोनवणे व समाजसेवक विक्रांत नरवाडे यांनी केले आहे.

No comments:
Post a Comment