जिल्हा प्रतिनिधी (बुलढाणा)
भुसावळ तालुक्यातील रहिवासी महा लोकसंवाद न्यूज चे पत्रकार संपादक श्री प्रकाश सुरवाडे यांना मलकापूर येथील कार्यक्रमांमध्ये उत्कृष्ट पत्रकारिता व सामाजिक कार्य केल्याबद्दल त्यांना मेडल व सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
सविस्तर असे की दि. 5/11/2025 रोजी मलकापूर जिल्हा बुलढाणा येथे हिंदी मराठी पत्रकार संघ व डिजिटल प्रेस क्लब ऑफ इंडिया च्या महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यामधून सामाजिक शैक्षणिक शिक्षक सांस्कृतिक कृषी सहकार उद्योग वैद्यकीय प्रशासकीय पत्रकारिता महिला कला साहित्य क्रीडा आधी क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था व मान्यवर विशेष कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून हा राज्यस्तरीय राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी सर्व महाराष्ट्रातून विविध क्षेत्रातून काम केलेल्या मान्यवरांचा येथे सन्मान करण्यात आला
यावेळी पत्रकार प्रकाश सुरवाडे यांना उत्कृष्ट पत्रकार राष्ट्र गौरव पुरस्कार 2025 देवुन सन्मानित करण्यात आले पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातून अभिनंदन करण्यात आले


No comments:
Post a Comment