महा लोकसंवाद न्यूज
जिल्हा प्रतिनिधी (ठाणे)
महागाई आणि बेकारीच्या विळख्यातून वाचण्यासाठी सामान्य माणूस कसा बसा जगत असताना एकीकडे अवैध धंद्यांना ऊत आला आहे तर दुसरीकडे धन काढून देणे किंवा जुन्या नाण्यांच्या नावावर तुम्हाला लखपती बनवून देणार त्यासाठी तुम्ही, आम्ही सांगणार तसे करा अशा लोकांचा ठाण्यामध्ये सुळसुळाट चालू झालेला आहे असा प्रकार भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेच्या समोर एका हवालदिल कुटुंबाकडून कथन करणारा आलेला आहे.
लुटल्या गेलेल्या इसमांकडून तब्बल एक लाख चार हजार रुपये फोन पे किंवा जी पे च्या माध्यमातून लुटण्यात आलेले आहे आणि प्रत्येक वेळेस आय डी बदलण्यात आलेली आहे त्या बरबाद झालेल्या व्यक्ती चे नाव भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटना विभागाकडे आलेले असून सध्या त्यांच्या कुटुंबाच्या सुरक्षेसाठी ते नाव गुलदस्त्यात ठेवलेले आहे. सायबर गुन्हेगारी वाढत असतानाच कदाचित लुटमार करणाऱ्याने त्याचे खोटं नाव टायटल मॅनेजर राज ग्यानी म्हणून सांगितलेले आलेले आहे. हा व्यक्ती प्रत्येक वेळेस आयडी चेंज करून वेगवेगळ्या सिम वर पैसे ट्रान्सफर करायचे सांगत गेला. समोरच्या माणसाला दहा हजार मागत गेला आणि पोलिसात गेला तर तुझी नोकरी जाईल किंवा जगणे मुश्कील होईल असे पण सांगत गेला आणि आज पर्यंत एक लाख 4 हजार रुपये त्यांनी हस्तगत करून त्या समोरच्या सामान्य माणसाचा मोबाईल हॅक, अकाउंट हॅक करून ठेवलेले आहे. भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्याध्यक्ष शेख गुलाब मामू आणि उत्तर महाराष्ट्र प्रवक्ता विशाल वाघ साहेब यांच्या माध्यमातून सर्वप्रथम ठाणे पोलीस प्रशासन ला मागणी करण्यात येत आहे की ठाण्यात चालणारा सुळसुळाट कदाचित हा खूप मोठा स्कॅन्डल असू शकतो हा त्वरित रोखण्यात यावा आणि गरीब कुटुंबाला न्याय मिळवून द्यावा अन्यथा भरपूर लोकांचे संसार उघड्यावर येतील याची शासनाने दखल घ्यावी.

No comments:
Post a Comment