महा लोकसंवाद न्यूज
मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
प्रकल्पग्रस्त बेरोजगार यांना कंत्राटी रोजगार देण्याबाबत
मन्यारखेडा ग्रामस्थ प्रकल्पग्रस्त बेरोजगार संघर्ष समिती औष्णिक विद्युत केंद्र दीपनगर तालुका भुसावळ येथील मुख्य अभियंता यांना निवेदन देण्यात आले
सविस्तर असे की
मन्यारखेडा तालुका भुसावळ जिल्हा जळगाव येथील प्रकल्प बधित बेरोजगार संघर्ष समिती चे अध्यक्ष व येथील सरपंच श्री अजय इंगळे यांनी दिपनगर प्रशासनाला निवेदन दिले त्या निवेदनात नमूद करण्यात आले की.
मन्यारखेडा हे गाव दिपनगर प्रकल्प औष्णिक विद्युत केंद्र अंतर्गत बधित गाव आहे गावातील शेती दीपनगर औष्णिक विद्युत केंद्र येथे संपादित आहे.
ज्यांनी दीपनगर प्रकल्पास उभारणी करता आपल्या उदरनिर्वाहाची शेती दिली ते गावातील कुटुंब सुरुवातीपासून दीपनगर येथील नोकरी व अन्य लाभापासून वंचित आहे तसेच बाहेरील कामगार ठेकेदार व बाकी बधित गावातील कामगार ठेकेदार आपल्याकडे मोठ्या प्रमाणात काम करत आहे मात्र दिपनगर औष्णिक विद्युत केंद्र येथे प्रकल्पग्रस्त प्रकल्प बधित मन्यारखेडा येथील बेरोजगार यांना आपल्याकडे कंत्राटी रोजगार उपलब्ध नाही तो देण्यात यावा प्रकल्प बधित संघर्ष समितीमार्फत तीन वेळा उपोषण करण्यात आले असताना देखील केवळ पोकळ आश्वासन देण्यात आले
कंत्राटी कामाबाबत वेळोवेळी आपल्याकडे येऊन देखील आपल्याकडून कामगारांची निराशाच झाली आपल्या मार्फत कोणतेही प्रकारचा न्याय देण्यात आला नाही
अनेक वेळा उपोषण केल्यामुळे प्रकल्पग्रस्त संघर्ष समिती चे कार्यकर्ते व अध्यक्ष यांना मानसिक त्रास झालेला आहे तरी मान्यरखेडा येथील बेरोजगार युवकांना योग्य तो निर्णय घेऊन रोजगार उपलब्ध करावा अन्यथा आपल्या दीपनगर प्रशासनाच्या विरुद्ध दिनांक 29/12/2025 पासून औष्णिक विद्युत केंद्र बूस्टर पंप हाऊस मन्यारखेडा शिवार येथे बेमुदत उपोषण करण्यात येईल सदर उपोषणा शासन प्रशासनाची बदनामी झाल्यास किंवा उपोषण करते यांच्या जीवित जंगली वन्य प्राणी यांच्यापासून काही अप्रिय घटना घडल्यास त्यास दिपनगर प्रशासन जबाबदार राहील अशा प्रकारचे निवेदन देण्यात आलेले आहे

No comments:
Post a Comment