गांजाच्या शेतीवर एलसीबीचा छापा आरोपीला अटक; ४ लाखाचा गांजा जप्त - MHL News

Breaking

Wednesday, 17 December 2025

गांजाच्या शेतीवर एलसीबीचा छापा आरोपीला अटक; ४ लाखाचा गांजा जप्त



देऊळगाव राजा

तालुक्यातील मेव्हणा राजा शिवारात तुरीच्या पिकात आंतरपीक म्हणून गांजाची बेकायदेशीर लागवड करणाऱ्या शेतकऱ्यावर स्थानिक गुन्हे शाखेने धाड टाकली आहे. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ३ लाख ८५ हजार १०० रुपये किंमतीचा ओला व सुका गांजा जप्त केला असून, आरोपीविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई १५ डिसेंबर रोजी करण्यात आली.

पोलीस अधीक्षक निलेश तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बुलढाणा व खामगाव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर व त्यांच्या पथकाला मेव्हणा राजा शिवारात गांजाची लागवड असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पथकाने मेव्हणा राजा येथील गट नंबर ३१९ मध्ये छापा टाकला.

यावेळी आरोपी विष्णू सुखदेव बोरुडे वय ३९, रा. मेव्हणा राजा याने आपल्या शेतात तुरीच्या पिकांमध्ये लपवून गांजाच्या झाडांची लागवड व संगोपन केल्याचे आढळून आले. पोलिसांनी शेताची झडती घेतली असता तिथे मोठ्या प्रमाणात गांजाची झाडे आढळून आली.

या कारवाईत पोलिसांनी गांजा २८ किलो ५१ ग्रॅम किंमत अंदाजे २,८५,१०० रुपये सुका गांजाः ४ किलो ७०० ग्रॅम किंमत ९४,००० रुपये एकूण ३ लाख ८५ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी विष्णू बोरुडे याच्याविरुद्ध देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात कलम २० (अ) एनडीपीएस अॅक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपासासाठी आरोपी व मुद्देमाल देऊळगाव राजा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला  केली आहे.


No comments:

Post a Comment