बुलढाणा : शिक्षक भरतीसाठी घेण्यात आलेल्या शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी (टेट) २०२५ चा अर्ज भरताना नाव, मोबाइल क्रमांक, ई-मेल आयडी आदी तपशीलांमध्ये झालेल्या त्रुटींमुळे पात्र ठरूनही अनेक उमेदवारांना पवित्र पोर्टलवर नोंदणी करता येत नव्हती.
या गंभीर समस्येचा पाठपुरावा केंद्रीय आयुष, आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेकडे केल्यानंतर अखेर या अडचणीवर तोडगा निघाला आहे. परिणामी, संबंधित उमेदवारांना आता दुरुस्तीची संधी उपलब्ध करून देण्यात आली आहे.'टेट' २०२५ परीक्षेच्या अर्जामध्ये उमेदवारांना दोन मोबाइल क्रमांक नोंदवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या; मात्र काही उमेदवारांनी केवळ एकच मोबाइल क्रमांक नोंदवला होता. तो क्रमांक कार्यान्वित नसल्यास पवित्रपोर्टलवरील स्वप्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण होत नव्हती.
या संदर्भात अनेक उमेदवारांनी केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची भेट घेऊन समस्या मांडली होती. त्यानंतर जाधव यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे शिक्षण आयुक्त बेडसे यांच्याशी संपर्क साधून उमेदवारांच्या अडचणी निदर्शनास आणून दिल्या व त्यावर योग्य तो मार्ग काढण्याची सूचना केली.
अखेर शिक्षण परिषदेने याबाबत परिपत्रक जारी करून दुरुस्तीची प्रक्रिया सुरू केली आ

No comments:
Post a Comment