बसची ट्रकला धडक; १२ विद्यार्थिनी जखमी जळगाव जामोद-आसलगाव मार्गावरील घटना - MHL News

Breaking

Monday, 29 December 2025

बसची ट्रकला धडक; १२ विद्यार्थिनी जखमी जळगाव जामोद-आसलगाव मार्गावरील घटना



जळगाव जामोद : तालुक्यातील कुरणगाड येथे विद्यार्थिनींना मानव विकास मिशनच्या बसमधून नेत असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ही बस ट्रकला धडकली. ही घटना २७डिसेंबर रोजी सकाळी सुमारे ११ वाजता जळगाव जामोद-आसलगाव मार्गावरील सुपो जिनिंगजवळ घडली.

या . अपघातात बसमधील १२  विद्यार्थिनी किरकोळ जखमी झाल्या जखमी विद्यार्थिनींना तत्काळ जळगाव जामोद ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचार देण्यात आले आणि नंतर त्यांना घरी पाठवण्यात आले, अशी माहिती मिळाली आहे. दरम्यान, अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थिनींची आमदार डॉ. संजय कुटे यांच्या पत्नी अपर्णा कुटे यांनी भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली.

अपघातात किरकोळ जखमी झालेल्या विद्यार्थिनींना जळगाव जामोद आगाराच्या वतीने प्रत्येकी एक हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आल्याचे आगार प्रमुख पवन टाले यांनी सांगितले. 

No comments:

Post a Comment