बुलढाणा :
अवैध दारूविक्रीविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारत सुंदरखेड येथे हातभट्टी दारू तयार करुन साठवणूक करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी रंगेहाथ पकडले. या कारवाईत १५ लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली असून, संबंधित आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलढाणा शहर पोलिस ठाण्याच्या पथकाने बुधवारी सुंदरखेड परिसरात धाड टाकली. यादरम्यान संशयास्पद हालचाली दिसल्याने पोलिसांनी नीलेश रामदास मोरे (वय ३२, रा. सुंदरखेड) याची झडती घेतली असता त्याच्या ताब्यातील प्लास्टिक कॅनमध्ये १५ लिटर हातभट्टी दारू आढळून आली.
सदर दारू व कॅन मिळून अंदाजे १,५५० रुपये किमतीचा मुद्देमाल पंचासमक्ष जप्त करण्यात आला. याप्रकरणी महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) अन्वये बुलढाणा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला असून, तपास पोलिस हवालदार सुभाष म्हस्के करीत आहेत.

No comments:
Post a Comment