चारचाकी झाडावर आदळल्याने ३ ठार; २ जखमी - MHL News

Breaking

Monday, 22 December 2025

चारचाकी झाडावर आदळल्याने ३ ठार; २ जखमी



मलकापूर: धुपेश्वर कडे जात असतांना गाडीवरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर आदळल्याने ३ युवक ठार तर २ जण जखमी झाल्याची घटना धरणगाव-धुपेश्वर रोहवर धरणगाव नजीक २१ डिसेंबर रोजी दुपारी ३.३० वा. दरम्यान घडलीमलकापूर शहरातील ५ युवक मलकापूर येथून धुपेश्वरकडे जात असतांना चालकाचे चारचाकीवरील नियंत्रण सुटल्याने मारूती अर्टीका गाडी क्र. एमएच १२ जेसी ७५०८ ही रस्त्याच्या

बाजूला असलेल्या झाडावर आदळल्याने गाडीतील रूद्र उमेश पवार (वय १९) रा. सावजीफैल, विनायक जनार्धन अत्तरकार (वय २०) रा. लक्ष्मीनगर गणेश दीपक इंगळे हे तिघे ठार झाले. तर प्रशांत राजू वनारे व तक्ष धुरंधर हे दोघे जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच मलकापूर येथून अनेकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. तर शहर पोलीस निरीक्षक गणेश गिरी हे सुध्दा पोलीस ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले.जखमींना पोलीस व उपस्थितांच्या मदतीने तातडीने उपचारार्थ मलकापूर येथील रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले.मलकापूर शहरात एकीकडे नगरपरिषद निवडणूक निकालाची चर्चा असतांना झालेल्या या अपघाताने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

No comments:

Post a Comment