महा.लोकसंवाद न्यूज/जळगाव
संस्कृती महाविद्यालय मेहरून जळगाव येथे प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
या प्रसंगी शालेय परिसरात प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. शालेय विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर गीतांवर नृत्य तसेच भाषण सादर केले. तसेच विद्यार्थ्यांनी व सर्व शिक्षकांनी कवायत संचालन केले. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जैन संघटनेत कार्यरत विद्यमान मा.दिपा पिनल देडीया व मा.श्री.उदयकुमार जैन जळगाव नगरीच्या माजी महापौर,संचालिका जे.डी.सी.सी.बँक व ग.स.सोसायटी, विद्यमान नगरसेविका मा.सौ.जयश्रीताई महाजन व तसेच मा.सुहानी सुराणा,श्री.दुर्गेश चोरडिया ,जय दुर्गा गृप चे सचिव मा.श्री.ललितभाऊ धांडे, कृ.उ.बा.समितीचे माजी सभापती श्री. ज्ञानेश्वरदादा नाईक, जय दुर्गा गृप चे सदस्य श्री. अनिलदादा पाटील
हे उपस्थित होते. मा.दिपा पिनल देडीया यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला.तसेच प्रमुख पाहूण्यांच्या हस्ते बक्षिस वितरीत करण्यात आले.बक्षिसांसाठी अखिल भारतीय टेंट असोसिएशन चे अध्यक्ष श्री.प्रदीपजी श्रीश्रीमाळ यांचे अनमोल सहकार्य आम्हास लाभले.
कार्यक्रमप्रसंगी मुलांना खाऊ वाटपाचा कार्यक्रम करण्यात आला प्रमुख पाहुणे व विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय डी.सी. येवले मॅडम यांच्या हस्ते पार पडला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्रीमती .मनीषा जाधव यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विद्यार्थी व पालक वर्ग यांनी सहकार्य केले

No comments:
Post a Comment