महा.लोकसंवाद न्यूज/ जळगाव
राज्यातील मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायत बाबत शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे
जानेवारी 2026 पासून डिसेंबर २०२६ पर्यंत अनेक ग्रामपंचायतीचा कार्यकाळ संपतो आहे. अशा मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमण्याची तयारी सुरू झाली आहे.
याबाबतचे एक पत्रक 23 जानेवारी रोजी काढण्यात आले आहे यास मंजुरीच्या आधीन राहून राज्यांमध्ये जानेवारी 2026 ते डिसेंबर २०२६ या कालावधी मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतीची निवडणूक होऊन नियमानुसार ग्रामपंचायत अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे
या अनुषंगाने उच्च न्यायालयाचा अवमान होणार नाही याची दक्षता घेऊन राज्यामध्ये जानेवारी 2026 ते डिसेंबर 2026 या ग्रामपंचायती ची मुदत संपेल तिथे नव्याने निवडणुका होतील त्यावर जोपर्यंत सदस्य निवडून येत नाही ग्रामपंचायत अस्तित्वात येत नाही तोपर्यंत प्रशासक नेमण्यासाठी मंजुरी देण्यात आली आहे
या संदर्भात एक महत्त्वाचा जीआर पत्र राज्य शासनाकडून काढण्यात आले आहे जिल्हाधिकारी जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांना अवर सचिव महाराष्ट्र शासन यांच्याकडून देण्यात आलेले आहे त्यानुसार आता संबंधित ग्रामपंचायत वर प्रशासक नेमली जाणार आहे

No comments:
Post a Comment