गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक'; सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन - MHL News

Breaking

Tuesday, 24 February 2026

गाव तिथे शाखा, घर तिथे सैनिक'; सरसेनानी आनंदराज आंबेडकरांचा विचार घराघरात पोहोचवण्याचे जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणेंचे आवाहन

 


भुसावळ /महा लोकसंवाद न्यूज 

मंगळवारी (२४ फेब्रुवारी) भुसावळ येथील अष्टभुजा मंदिर समोरील कॉम्प्लेक्स मध्ये दुपारी ०१:०० वा. आयोजित रिपब्लिकन सेनेची भव्य जिल्हास्तरीय बैठक मोठ्या उत्साहात संपन्न झाली.

आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची ठरली.


अध्यक्षीय भाषणात कार्यकर्त्यांना संबोधित करताना जिल्हाध्यक्ष विनोद सोनवणे म्हणाले, "हा केवळ निवडणुकांचा लढा नसून दलित , मुस्लिम, बहुजन,आदिवासींच्या स्वाभिमानाचा एल्गार आहे. आतापर्यंत ज्यांनी आमचा वापर केला, त्यांची झोप उडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. प्रत्येक कार्यकर्त्याने आता घराघरात सरसेनानी आनंदराज आंबेडकर साहेबांचे कार्य पोहोचून गाव तिथे शाखा व घर तिथे रिपब्लिकन सैनिक तयार करण्यासाठी सज्ज व्हा

या बैठकीत संघटन वाढीसाठी महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. रिपब्लिकन सेना जिल्हा महासचिव पदी अरुण तायडे,जळगाव तालुका अध्यक्ष पदी अनिता सपकाळे, भुसावळ शहराध्यक्ष (दक्षिण) पदी लिलाधर सपकाळे यांची नियुक्ती करून त्यांच्यावर मोठी जबाबदारी सोपवण्यात आली.

प्रमुख उपस्थित पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले 

 प्रमोद इंगळे (कामगार सेना जिल्हाध्यक्ष): "तालुका आणि शहर स्तरावर पक्ष अधिक आक्रमक करण्यासाठी लवकरच नवीन आणि लढाऊ नियुक्त्यांची घोषणा केली जाईल."

 दिनेश इखारे (जिल्हा नेते): "रिपब्लिकन सेनेचा उद्देश केवळ निवडणूक लढवणे नव्हे, तर 'किंगमेकर' होण्यासाठी बूथ स्तरावर अभेद्य तटबंदी उभारणे हा आहे."

 वंदनाताई सोनवणे (महिला सेना जिल्हाध्यक्षा): "महिलांच्या प्रश्नांसाठी आणि वंचितांच्या हक्कासाठी महिला सेना आता रस्त्यावर उतरून अधिक आक्रमक लढा देणार आहे."


याप्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष देवदत्त मकासरे मेजर, जिल्हा महासचिव (महिला सेना) वंदनाताई आराक, भडगाव तालुकाध्यक्ष वाल्मीक लोखंडे,जिल्हा संघटक प्रमोद बावस्कर , हेमंत सोनवणे (जळगाव),बंटी नरवाडे,दिपक इंगळे(उचंदा), कामगार सेना जिल्हा उपाध्यक्ष दिलीप भालेराव, शर्मिला तायडे, राजेंद्र बारी, सिध्दार्थ पारधे, खैरनार (भडगाव),पारोळा तालुकाध्यक्ष गौतम पवार, जामनेर तालुकाध्यक्ष रवि मोरे,प्रशांत तायडे (न्हावी), रिपब्लिकन सेना IT सेल प्रमुख स्वप्नील सोनवणे , प्रशांत तायडे (वरणगाव),बंटी सोनकांबळे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. लवकरच उर्वरित तालुका कार्यकारिणींची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.

No comments:

Post a Comment