न्यूज/प्रतिनिधी
खडका भुसावळ एमआयडीसी च्या जमिनीवर ऐवद्य गौण खनिज मुरूम उत्खनन चालू आहे ते तात्काळ बंद करून संबंधितावर गुन्हे दाखल करा
अशी मागणी रिपब्लिकन सेनेने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडे करण्यात आली
सविस्तर असे की भुसावळ तालुक्यातील कन्हाळा गावाजवळील खडका औद्योगिक वसाहतीच्या (MIDC) मालकीच्या जमिनीवर गेल्या १५ दिवसांपासून 'मुरूम माफियांच्या' टोळीने धुमाकूळ घातला असून, मोठ्या प्रमाणावर अवैध माती व मुरूम उत्खनन सुरू आहे सदर ठिकाणी जेसीबी (JCB) आणि पोकलेन मशीनच्या साहाय्याने दिवस-रात्र उत्खनन करून महसूल प्रशासनाच्या नियमांची सर्रास पायमल्ली केली जात आहे. प्रशासकीय यंत्रणेचा कोणताही धाक या माफियांना उरलेला नाही, असे चित्र सध्या दिसत आहे. आतापर्यंत अंदाजे २ हजार पेक्षा जास्त ब्रास मुरुमाची अवैध चोरी झाली आहे. यामुळे शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडाला असून पर्यावरणाची देखील मोठी हानी झाली आहे.
औद्योगिक क्षेत्रासाठी राखीव असलेल्या जमिनीचे नुकसान करून सरकारी मालमत्तेवर डल्ला मारणाऱ्या या टोळीला कोणाचे पाठबळ आहे? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. औद्योगिक वसाहतीसाठी निश्चित केलेल्या जमिनीच्या सीमांकन खुणा (Boundary Stones) या उत्खननामुळे नष्ट करण्यात आल्या असून, भविष्यात जमिनीच्या मोजणीत गुंतागुंत निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही "या परिसरात महसूल विभागाच्या भरारी पथकाची गस्त वाढवण्यात यावी आणि चोरीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रमुख रस्त्यांवरील CCTV फुटेज तपासून वाहनांचे क्रमांक शोधण्यात यावेत." "सदर मुरूम विक्रीतून मिळणारा पैसा हा काळ्या बाजारात जात असून, शासनाची अंदाजे १ कोटी रुपयांहून अधिकची रॉयल्टी (Ownership/Royalty) चोरी झाली आहे. ही रक्कम संबंधित माफियांकडून वसूल करण्यात यावी." "विशेष बाब: या परिसरात अवजड वाहनांच्या (डंपर) सततच्या वाहतुकीमुळे ग्रामीण भागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून, धुळीच्या प्रदूषणामुळे कन्हाळा परिसरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. त्यामुळे हे उत्खनन केवळ महसूल चोरी नसून सामाजिक सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे
सदर उत्खनन क्षेत्राचा तात्काळ पंचनामा करून अनधिकृत उत्खनन मोजावे.
या प्रकरणात सहभागी असलेले जेसीबी, पोकलेन व डंपर मालकांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
मुरूम माफियांच्या टोळीवर गुन्हे दाखल करून शासनाचा बुडालेला महसूल दंडस्वरूपात वसूल करावा.
जर पुढील ४८ तासांच्या आत या अवैध उत्खननावर ठोस कारवाई झाली नाही, तर रिपब्लिकन सेनेच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, याची सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची असेल.
यावेळी अपर जिल्हाधिकारी डॉ श्रीमंत हारकर यांना निवेदन दिले विनोद सोनवणे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन सेना, प्रमोद इंगळे जिल्हाध्यक्ष रिपब्लिकन कामगार सेना, विक्रांत नरवाडे जिल्हा सदस्य उपस्थित होते

No comments:
Post a Comment