जुगार अड्यावर धाड; ९ जणांवर केली कारवाई - MHL News

Breaking

Wednesday, 13 May 2026

जुगार अड्यावर धाड; ९ जणांवर केली कारवाई


महा लोकसंवाद न्यूज 

जिल्हा प्रतिनिधी/बुलडाणा 


शेगाव : शहर पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे येथील हॉटेल मल्हार समोरील सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर धाड टाकून ९ जुगारी विरूद्ध कारवाई केली. ही कारवाई ७ मे रोजी दुपारी १.२८ वाजता करण्यात आली.


याप्रकरणी पोहेकॉ राजेंद्र मनोहर टेकाळे, स्थानिक गुन्हे शाखा बुलढाणा यांच्या फिर्यादीवरून शेगाव शहर पोलीस ठाण्यात अप क्रमांक २९२/२०२६ अन्वये महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी कारवाईदरम्यान आरोपींकडून २९ हजार ९०० रुपये रोख रक्कम, ९ मोबाईल फोन, डॉट पेन तसेच वरली मटका आकडे लिहिलेल्या चिठ्ठ्या असा एकूण ८७ हजार ९२५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.या कारवाई मुळं पुर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे 


या प्रकरणातील आरोपींमध्ये प्रकाश एकनाथ वानखेडे (रा. चिंचोली ता. शेगाव), ईश्वर गजानन बोरसे (रा. चौंडी ता. संग्रामपूर), शिवाजी नामदेव भेंडे (रा. पाळोदी ता. शेगाव), लाला कन्हैयालाल कछवा (रा. व्यंकटेश नगर शेगाव), विलास सहदेव कात्रे (रा. व्याळा ता. बाळापूर), विजय प्रभाकर साळवे (रा. म्हाडा कॉलनी शेगाव), दिलीप फकीरा तायडे (रा. म्हाडा कॉलनी शेगाव), तेजराव सुखदेव इंगळे (रा. चिंचोली ता. शेगाव) व अरुण लक्ष्मण शेगोकार (रा. मंदिर परिसर शेगाव) यांचा समावेश आहे.


पोलिसांनी पंचांसमक्ष रेड करून संबंधितांकडून जुगार साहित्य व मुद्देमाल जप्त केला असून या प्रकरणाचा पुढील तपास जीपीएसआय गावंडे हे करीत आहेत.

No comments:

Post a Comment