महा.लोकसंवाद न्यूज/विशेष प्रतिनिधी/जळगाव
संघरत्न सपकाळे..✍️
भुसावळ : तालुक्यातील रेशन दुकानदारांची उद्या 5 जून 2026 रोजी महत्त्वपूर्ण आढावा बैठकीचे आयोजन शुक्रवारी 11 वाजता शामा प्रसाद मुखर्जी उद्यान येथे करण्यात आले आहे.
या बैठकीला रेशन दुकानदार संघटनेचे जिल्हा प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती जळगाव जिल्हा प्रसिद्धीप्रमुख कैलास उपाध्याय व संघटनेचे तालुका अध्यक्ष महेंद्र सपकाळे यांनी दिली आहे.
रेशन दुकानदारांच्या प्रलंबित मागण्यासाठी संघटनेची आढावा बैठक घेण्यात येणार असून दुकानदारांच्या विविध समस्यांचे निराकरण करण्यासाठी ही बैठक घेण्यात येणार आहे.
आढावा बैठकांमधील प्रमुख मुद्दे..
कमिशन थकीत राहणे.. दुकानदारांना मिळणारे कमिशन वेळेवर मिळत नसल्याने अनेकदा रेशन दुकानदारांना आर्थिक अडचणी निर्माण होत आहेत.
सर्वर डाऊन समस्या...
ई पॉस (E- POS) मशीनवर सर्वर डाऊन मुळे धान्य वाटपात अडथळे येतात ज्यामुळे लाभार्थी आणि दुकानदारांमध्ये वाद-विवाद होतात.
(e-KYC) सक्ती, इस्टांक वाढवणे धान्य (कोटा) या संदर्भात आयत्या वेळेवर येणाऱ्या विषयांवर चर्चा करण्यात येणार आहे.
या बैठकीला प्रमुख मार्गदर्शन म्हणून जळगाव जिल्हा संघटनेचे जिल्हा सचिव सुनील अंभोरे राज्य उपाध्यक्ष भागवत पाटील प्रसिद्धी प्रमुख कैलास उपाध्याय तसेच तालुक्याचे अध्यक्ष महेंद्र सपकाळे हे दुकानदार बांधवांना मार्गदर्शन करणार आहेत. तरी सर्व दुकानदार बांधवांनी बैठकीला हजर रहावे. असे आवाहन तालुका उपाध्यक्ष सी आर पाटील तालुका सचिव उल्हास भारसके शहराध्यक्ष आरिफ मिर्झा तसेच महिला मंडळाच्या तालुकाध्यक्ष टीना धांडे यांनी केले आहे..

No comments:
Post a Comment