आचेगाव येथील ग्रामपंचायत वार्ड रचनेमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना आरक्षण मिळावे - MHL News

Breaking

Friday, 19 June 2026

आचेगाव येथील ग्रामपंचायत वार्ड रचनेमध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना आरक्षण मिळावे

 




सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रकाश सुरवाडे यांनी घेतली हरकत 


महा.लोकसंवाद न्यूज/प्रतिनिधी 

आचेगाव ता.भुसावळ येथील ग्रामपंचायत मध्ये एससी एसटी  प्रवर्गाला आरक्षण मिळावे अशी हरकत सामाजिक कार्यकर्ते पत्रकार प्रकाश सुरवाडे यांनी वार्ड रचना आरक्षणावर  घेतली आहे.

 

सविस्तर असे की. दिनांक 11 जून रोजी रोजी आचेगाव ग्रामपंचायत मध्ये आरक्षण सोडत पार पडली त्यामध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती यांना डावलण्यात आले असून येथे अनुसूचित जाती जमाती यांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात असून सुद्धा एससी एसटी समाजाला आरक्षण मिळाले नाही येथे एससी एसटी दोन्ही मिळून शंभर ते दीडशे लोकसंख्या असून सुद्धा आरक्षण मिळाले नाही ही लोकशाहीची हत्या असून येथे फेर आरक्षण काढून एससी एसटी समाजाला न्याय मिळावा अशी हरकत श्री प्रकाश सुरवाडे यांनी  घेतली आहे

No comments:

Post a Comment