समता सैनिक दलाची चाळीसगाव येथे मासिक बैठक उत्साहात संपन्न; - MHL News

Breaking

Monday, 27 July 2026

समता सैनिक दलाची चाळीसगाव येथे मासिक बैठक उत्साहात संपन्न;

 





संघटन बळकटी करणाचा निर्धार करत कामला सुरुवात करा..मार्शल किशोर डोंगरे*


चाळीसगाव* | वार्ताहर | 26 जुलै 2026

विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी विचारांचा प्रसार आणि संघटन अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने समता सैनिक दल, चाळीसगाव शाखेची मासिक आढावा बैठक रविवारी दि. 26 जुलै 2026 सकाळी 11.00 वाजता सिंधी समाज हॉल, रेल्वे स्टेशन, चाळीसगाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.

महाराष्ट्र राज्याध्यक्ष मा. धर्मभूषण बागुल यांच्या सूचनेनुसार ही बैठक समता सैनिक दलाचे जिल्हाध्यक्ष (पश्चिम) मार्शल किशोर डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.बैठकीस जिल्हा संघटक अभिमान बाविस्कर, तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव, शहराध्यक्ष विशाल पगारे यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, सैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.


बैठकीत गेल्या महिन्यातील संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या. आगामी सामाजिक उपक्रम, जनजागृती अभियान, संघटन विस्तार आणि नव्या सदस्य नोंदणी बाबत सविस्तर चर्चा करून कृती आराखडा निश्चित करण्यात आला.

मार्शल किशोर डोंगरे यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना संघटनात्मक शिस्त, जबाबदारी, सामाजिक बांधिलकी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा तळागाळा पर्यंत प्रसार करण्याचे आवाहन केले. समाजहिताचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासाठी प्रत्येक सैनिकाने सक्रिय राहण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

बैठकीत भारतीय संविधानातील समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाच्या मूल्यांचा प्रचार-प्रसार करण्याचा तसेच समाजहितासाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा सर्व उपस्थितांनी संकल्प केला.


संघटना मजबूत समाज सशक्त* या ब्रीदवाक्याचा निर्धार व्यक्त करत बैठक उत्साहात संपन्न झाली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजना बद्दल तालुका अध्यक्ष महेंद्र जाधव व शहराध्यक्ष विशाल पगारे यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.


बैठकीस तालुकाध्यक्ष महेंद्र जाधव, शहराध्यक्ष विशाल पगारे, महिला आघाडी प्रमुख माया आहिरे, सोनाली लोखंडे, तालुका प्रचारक शिवाजी शिंदे, ज्ञानेश्वर बागुल, शरद जाधव, बाबा पगारे, कृष्णा जाधव, संदीप बागुल, गोपाल भालेराव, सोमनाथ गायकवाड, सुरेश खैरे, चेतन जाधव, विशाल मोरे, ललित सूर्यवंशी, सुनील निकम, अशोक जगताप, उमेश जाधव, संभाजी महाले, सुभाष निकम, रघुनाथ बागुल, दिलीप चव्हाण, काकाजी जाधव, अजय जाधव, अजय सोनवणे, भाऊसाहेब वाघ, अश्विनी बनसोडे, विमल घावरी, मीना जाधव, रंजना भाबड, ज्योती बाविस्कर, कविता सरदार, नेहा राठोड, सोनाली तिरमली, कार्यालयीन सहाय्यक घनश्याम बागुल यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.



No comments:

Post a Comment