भुसावल महसूल विभागाची धडक कारवाई 3 ब्रास गौण खनिजासह डंपर जप्त - MHL News

Breaking

Sunday, 26 July 2026

भुसावल महसूल विभागाची धडक कारवाई 3 ब्रास गौण खनिजासह डंपर जप्त

  



महा लोकसंवाद न्यूज

प्रतिनिधी/ वरणगाव 


,दि.२६ रोजी –भुसावळ तालुक्याच्या तहसीलदार श्रीमती नीता लबडे यांच्या नेतृत्वाखाली महसूल विभागाने अवैध गौण खनिज मुरूम उत्खनन व विरोधात मोठी कारवाई केली 3 ब्रास अवैधरित्या उत्खनन केलेले गौण खनिज मुरूम वाहून नेणारा डंपर जप्त केला. 


मिळालेल्या माहितीनुसार, एम एस .19.CX.6711 क्रमांकाचा डंपर तळवेल परिसरात अवैधरीत्या गौण खनिजाची वाहतूक करत असल्याची माहिती महसूल विभागाला मिळाली होती. त्यानुसार महसूल विभागाने सापळा रचून वाहन अडविले.तपासणी अंती वाहनामध्ये सुमारे 3 ब्रास गौण खनिजाचा अवैध साठा आढळून आला.या प्रकरणात आरोपी चालक सतीश गोपाल कोळी (रा.ओझरखेडा) याच्याकडून वाहन ताब्यात घेण्यात आले असून डंपरचा मालक. अनिकेत इंगळे (रा.ओझरखेडा ता.भुसावळ) असल्याची माहिती समोर आली आहे.


संबंधित व्यक्तीकडे आवश्यक परवाने व वैध कागदपत्रे नसल्याने वाहन जप्त करण्यात आले असून महसूल नियमांनुसार दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.ही कारवाई भुसावळ तहसीलदार नीता लबडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरणगाव मंडळ अधिकारी रजनी तायडे,पोलीस उपनिरीक्षक जैन साहेब,तसेच महसूल व पोलीस विभागाचे कर्मचारी मनोज म्हस्के,सुधाकर शिंदे,यासीन पिंजारी,प्रशांत ठाकूर आदींच्या उपस्थितीत पार पडली.


महसूल प्रशासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की,अवैध उत्खनन व गौण खनिज वाहतुकीला कोणतीही मुभा दिली जाणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहणार असून अशा कारवायांची तीव्रता आणखी वाढविण्यात येणार आहे.

या धडक कारवाईमुळे अवैध वाळू व गौण खनिज माफियांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून महसूल व पोलीस प्रशासनाच्या संयुक्त मोहिमेचे नागरिकांकडून स्वागत केले जात आहे.

No comments:

Post a Comment