*पाचोरा, दिनांक ९ ( प्रतिनिधी महा.लोकसंवाद न्यूज )* : निर्मल सीडस कंपनीच्या वतीने दिवंगत आमदार आर. ओ. तात्या पाटील यांच्या पुण्यस्मरणार्थ निर्मल जलसेवा आजपासून सुरू करण्यात आली आहे.
निर्मल सीडस कंपनीच्या वतीने सध्या सुरू असलेल्या कडक उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर निर्मल जलसेवा सुरू करण्यात आली आहे. याच्या अंतर्गत महाराणा प्रताप चौक आणि छत्रपती शिवाजी महाराज चौक, जारगाव चौफुली येथे पाणपोया सुरू करण्यात आल्या आहेत. येथील रांजणांमधील शुध्द आणि शीतल जल येथून ये-जा करणार्यांना उपलब्ध करण्यात आले आहे.
आज महाराणा प्रताप यांच्या जयंतीचे औचित्य साधून शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या वैशालीताई नरेंद्रसिंग सुर्यवंशी यांच्या हस्ते या पाणपोयांचे लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि निर्मल परिवारातील मान्यवरांची उपस्थिती होती.
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो .९५९५७५५०९७


No comments:
Post a Comment