रावेर लोकसभा मतदारसंघ संदर्भात विशेष वृत्त. रामेश्वर लोहार भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटना जिल्हाध्यक्ष व उपसंपादक महा. लोकसंवाद न्यूज - MHL News

Breaking

Thursday, 9 May 2024

रावेर लोकसभा मतदारसंघ संदर्भात विशेष वृत्त. रामेश्वर लोहार भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटना जिल्हाध्यक्ष व उपसंपादक महा. लोकसंवाद न्यूज




रावेर लोकसभा मतदारसंघातील विशेष वृत्त म्हणजे कमी दिवसाच्या प्रचारात दोघेही उमेदवार अपूर्णच पडत आहे कारण आतापर्यंत मतदानाच्या विषयी लोकांनी विषय काढला म्हणजे लोकांचे डोके तापते व

शेतकरी वर्ग नाराज व तरुण वर्ग सुद्धा या बोदवड मुक्ताईनगर जामनेर भुसावळ सोडले तर उद्योगाचे नवीन कोणतेच पर्याय व रोजगार उपलब्ध होईल असे फक्त कापसाच्या जिनिंग व दुसरे काहीच नाही दहा वर्ष झाले रक्षाताई खासदार असताना एकही नवीन उद्योग या परिसरात आलेला नाही बोदवड मध्ये शासकीय कामे करणारे व ठेकेदारी मोठ्या प्रमाणात वर डोकं करून गटबाजी निर्माण झालेली एक मोठी समस्या आहे जुने सर्व कार्यकर्ते व इतर नावे यांमध्ये मतभेद काही ठिकाणी तुम लढो हम कपडे संभालते अशी स्थिती झालेली आहे राहील लोकसभा मतदारसंघातील श्रीराम पाटलांची बनणारी बाजू म्हणजे ते स्वतः उद्योजक असून सर्व परिसरातील सर्वे केला असता शेतकरी पुत्र व उद्योग यामुळे त्यांना त्यांच्या नावाला चांगली पसंती मिळत आहे व आतापर्यंत कोणताही डाग त्यांना लागलेला नाही म्हणून मतदारांच्या मनात एक वेगळाच उत्साह निर्माण झालेला आहे तथापि आतापर्यंत एवढा माहोल दिसलेला नाही परंतु ते सुद्धा प्रचाराच्या बाबतीत कमी पडत आहे संघटना स्वराज्य संस्था व इतर संस्था यांच्या सदस्य अध्यक्ष यांना ते सुद्धा बोलून व विसरून गेले असे चित्र स्पष्ट निर्माण झाले आहे तरी शेतकऱ्याची बाब लक्षात घेता गावागावांमध्ये परिस्थिती पाहता कापसाला काय भाव मिळाला आणि सोयाबीनला काय भाव मिळाला हे लक्षात न घेता उत्साहाने काही आपली बाजू मांडत आहे परंतु दहा वर्षात जो काही काम व कामे अपूर्ण राहिलेली आहेत ते पूर्ण करण्याचे स्वप्न व कार्यकर्ते व ताई लोकांच्या पुढे जात आहे व जिनोने राम को लाया है हमे उन्हे लाना है आपले मत मोदीजीना या मुद्द्यावर वातावरण तापत आहे काही नाराजीचे सुर काही काही उत्साहाचे वातावरण निर्मिती सुरू आहे हळूहळू प्रचाराचा कार्यकाळ संपत येत आहे परंतु काही गावांना भेटी द्यायचे राहूनच जात आहे का असे प्रश्न मतदारांना वाटत आहे व उमेदवार आपल्यापर्यंत पोहोचला नाही याची खंत जनतेला मतदारांना वाटत आहे कारण प्रचाराचे ताळमेळ बसत नाही व अशाच यामधील राहिलेले दिवस असेच निघून जाणार का व प्रचाराची तोफ शांत होईल परंतु प्रश्न मात्र कायम राहतील म्हणून उमेदवारांनी स्वतः प्रचाराचा वेग वाढवून वस्ती वस्ती गल्ली गल्लीत खेड्यापाड्यात गावागावात जाऊन गोरगरिबांची व शेवटच्या घरापर्यंतची भेट घेतली तर फायदा होईल येणाऱ्या निवडणुकीत उमेदवाराला होईल

जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक मो. ९५९५७५५०९७

No comments:

Post a Comment