एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त नांदगाव नगरपरिषद येथे मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न - MHL News

Breaking

Friday, 3 May 2024

एक मे महाराष्ट्र दिनानिमित्त नांदगाव नगरपरिषद येथे मतदान जनजागृती कार्यक्रम संपन्न

 


महा.लोकसंवाद न्यूज 

जिल्हा प्रतिनिधी: नाशिक


   आज नांदगाव नगरपरिषद येथे 1 मे महाराष्ट्र दिन ध्वजारोहण कार्यक्रमानंतर शालेय विद्यार्थी, शिक्षक, ज्येष्ठ नागरिक, बचत गटातील महिला व नागरिक कर्मचारी यांनी माननीय तहसीलदार श्री सुनील सौंदाणे साहेब, पोलीस निरीक्षक श्री प्रीतम चौधरी साहेब, गटविकास अधिकारी श्री दळवी साहेब, तालुका वैद्यकीय अधिकारी श्री. संतोष जगताप साहेब, मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री विवेक धांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान जनजागृती साठी प्रभात फेरी काढण्यात आली . सदर प्रभात फेरी ची सुरुवात नांदगाव नगरपरिषद प्रांगणातून झाली.कालिका चौक,महात्मा फुले चौक, महात्मा गांधी चौक, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक या मार्गाने मार्गक्रमण नांदगाव नगरपरिषद प्रांगणात समारोप करण्यात आला याप्रसंगी मुख्याधिकारी तथा प्रशासक विवेक धांडे साहेब यांनी उपस्थित नागरिकांना मतदान जनजागृती ची शपथ देण्यात आली.


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक मो. ९५९५७५५०९७

No comments:

Post a Comment