प्रतिनिधी: जळगाव (महा.लोकसंवाद न्यूज)
जळगाव - महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे अध्यक्ष तथा आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मुकुंद सपकाळे यांचे लहान बंधू अनिल लोटू सपकाळे (वय ५० वर्षे ) यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने आज मंगळवार , दिनांक ११/०६/२४ रोजी दुःखद निधन झाले आहे. त्यांची अंत्ययात्रा उद्या बुधवार , दिनांक १२/०६/२४ रोजी सकाळी १० वाजता वाघ नगर परिसरातील संविधान नगर येथील राहत्या घरून निघणार आहे. नेरी नाका स्मशानभूमी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी , मुलगा , मुलगी , भाऊ असा परिवार आहे.

No comments:
Post a Comment