महा.लोकसंवाद न्यूज (जळगाव)
सविस्तर वृत्त असे की. संस्कृती महाविद्यालय मेहरून जळगाव येथे नारीशक्ती बहुउद्देशीय संस्था जळगाव यांच्याकडून शाळेतील विद्यार्थ्यांना वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. नारीशक्ती बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा. माननीय श्रीमती. मनीषा पाटील व संस्थेचे पदाधिकारी श्रीमती सीमा जाधव श्रीमती.नूतन तासखेडेकर . श्रीमती नेहा जगताप. श्रीमती वंदना मंडावरे व श्रीमती अर्चना पाटील तसेच श्रीमती ज्योती राणे हे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आले संस्थेच्या सौजन्याने विद्यालयात वह्या वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी श्रीमती. ज्योती राणे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले . कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाच्या शिक्षिका श्रीमती. मनीषा जाधव यांनी केले तर आभार प्रदर्शन श्रीमती ए वाय फालक यांनी केले. त्याप्रसंगी विद्यालयाचे. मुख्याध्यापिका सौ. डी.सी येवले व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. विद्यालयाच्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो.९५९५७५५०९७
.jpg)
No comments:
Post a Comment