तळवेल येथे जुगार अड्ड्यावर धाड 16 जणांना अटक वरणगाव पोलिसांची धडक कारवाई - MHL News

Breaking

Saturday, 27 July 2024

तळवेल येथे जुगार अड्ड्यावर धाड 16 जणांना अटक वरणगाव पोलिसांची धडक कारवाई

 



 (महा.लोकसंवाद न्यूज)

प्रतिनिधी: वरणगाव ता.भुसावळ

वरणगाव : येथून जवळच असलेल्या तळवेल गावी रात्री बाराचे सुमारास जुगार खेळत असणाऱ्या लोकांची गुप्त माहिती मिळाल्यावरून वरणगाव पोलिसांनी रात्री बाराचे सुमारास तळवेल गावी जाऊन 16 जुगारींना झन्ना मन्ना पत्ता खेळत असताना अटक केली .

 याबाबत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तळवेल तालुका भुसावळ या गावी मराठी शाळेच्या मागच्या बाजूला जन्ना मन्ना नावाचा 52 पत्त्यांचा जुगार चालू असल्याची माहिती वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी यांना मिळाली त्यावरून दि .२६ शुक्रवार रात्रीचे वेळी वरणगाव पोलीसांनी तळवेल गावी जाऊन जुगारावर धाड टाकली त्यामध्ये दीपक चंद्रकांत सुरवाडे २८ विजय सुरेश बेंडाळे ३५ सुधीर राजाराम पाटील ५० अशोक दौलत सपकाळे ६१ प्रवीण सुभाष सुरवाडे ३५ भरत जनार्दन पाटील ३५ निखिल कडू धाटे २७ अमित अमिर पिंजारी ३० सर्व रा . तळवेल , तसेच भानुदास प्रल्हाद धनगर ३५ मुजफ्फर शेख अन्सार २७ 'शेख बबलू शेख बाबू ३६ शेख मुस्ताक शेख बशीर ३३ ' शे अहमद शेख मुसा 32 शेख जुनेद शेख सलीम 23 शेख बिस्मिल्ला शेख कादर ३५ शेख शोएब शेख सलीम ३५सर्व राहणार वरणगाव अशा 16 जणांना पत्ते खेळतांना अटक करण्यात आली असून त्यांचे कडून एकूण 11170 रुपये जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर जुगार ऍक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे . सदर गुन्हा श्रावण जवरे सहाय्यक फौजदार यांनी दाखल करून घेतला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद कंखरे करीत आहेत .


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)

मो. 9595755097

No comments:

Post a Comment