हिंदी मराठी पत्रकार संघटनेची तहसीलदार यांच्याकडे मागणी
महा.लोकसंवाद न्यूज
प्रतिनिधी (भुसावळ)
भुसावळ तालुक्यातील सुसरी विल्हाळे शिवारात बरेच शे. विट भट्टया वाले आपले विट भट्ट्यांचा व्यवसाय राज-रोज पणे करीत असून भट्ट्यासाठी लागणारी माती व राख शासनाला कुठल्याही प्रकारचे रॉयल्टी, न भरता आज रोजी आपण प्रत्यक्ष भट्टयांची चौकशी केली तर भट्टयाजवळ अवैध रित्या माती व राख साठवलेली आहे. शासनाच्या लाखो रूपयांचा रॉयल्टी गौण खनिज महसूल बुडविलेला आहे. सुसरी ते विल्हाळे शिवारात 10 ते 12 विट भट्टे जवळ हजारो ब्रास माती व राखेचा साठा साठवलेला आहे. सदरचा प्रकार दोन तीन वर्षांपासून गोरख धंदा सुरू आहे. लाखो रूपयांचा महसूल प्रत्येकी विट भट्टा धारकाने बुडविलेला आहे. परंतू त्याकडे तलाठी किंवा मंडल अधिकारी यांनी जाणुन-बुजून या व्यवसायिकाडे काना डोळा करण्यात आला आहे. याकडे प्रशासन लक्ष देईल का? असा सुर जनतेतून येत आहे.
शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडवत असतांना महसुल कर्मचारी यांकडे लक्ष देत नाही. प्रशासनाकडे वारंवार तक्रारी देवून सुध्दा या अगोदर सुध्दा अश्या प्रकारे तक्रारी केल्या आहेत मात्र सदर तक्रारींकडे पूर्ण दुर्लक्ष करण्यात आले.
तरी सदर प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर योग्य ती कठोर कारवाई करण्यात यावी
आठवड्याभरात कारवाई न झाल्यास हिंदी मराठी पत्रकार संघातर्फे संविधानिक मार्गाने आंदोलन करण्यात येईल
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
मो.9595755097

No comments:
Post a Comment