जामनेर तालुक्यातील नांद्रा हवेली गावात घाणीचे साम्राज्य ... नागरिकांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष - MHL News

Breaking

Friday, 12 July 2024

जामनेर तालुक्यातील नांद्रा हवेली गावात घाणीचे साम्राज्य ... नागरिकांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष

 


महा.लोकसंवाद न्यूज

प्रतिनिधी (जामनेर)

जामनेर तालुक्यातील नांद्रा हवेली गावात घाणीचे साम्राज्य पसरले असून गावकऱ्यांच्या आरोग्याकडे ग्रामपंचायतीचे साफ दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. गावातील संपूर्ण रस्त्यांवर घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासन मात्र पूर्णपणे दुर्लक्ष करत

असल्याचे दिसून येते आहे या गावामध्ये मूलभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात अभाव आहे. ह्या सुविधा पुरवण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासन पूर्णपणे अपयशी ठरत आहे. गावांमध्ये बहुतांश रस्त्यांचे बांधकाम झालेले नसल्याने गटारी देखील बांधण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे गावातील संपूर्ण सांडपाणी व पावसाचे पाणी  रस्त्यावर तुंबल्याने सर्वदूर गटारे साचली आहेत, असा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. या साचलेल्या पाण्यात मोठ्या प्रमाणात डासांची उत्पत्ती होत आहे. सोबतच दुर्गंधीमुळे देखील नागरिक बेजार झाले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यामध्ये डेंग्यू आणि मलेरियाचा प्रादुर्भाव होत असल्याने या घाणीचे साम्राज्या परसल्याने गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यासंदर्भात नागरिकांनी वेळोवेळी तोंडी तक्रारी केल्या, मात्र ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केले असे गावकऱ्यांनी सांगितले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊ

न गावातील समस्यांचे निवारण करावे अशी मागणी करण्यात आली आहे

अंगणवाडी दर्शनी भागात संजा पूर्णपणे लटकला असुन तिथ गावाचे चिमुकले मुठीत जिव घेऊन जाणे येणे करता विद्यार्थी याच्या पालकांच्या मनात भिंती तयार झाली आहे

नागरिकांच्या आरोग्य सेवा गावात उपलब्धता व्हावी म्हणून गावात उपकेंद्र इमारत उभारण्यात आली असून फक्त शोपीस आहे का ? अस खडा सवाल जनतेच्या मनात येत आहे तिथ आरोग्य विभाग कडून कर्मचारी नियुक्त करण्यात येईल का याकडे सर्वाचे लक्ष लागुन आहे


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो.९५९५७५५०९७

No comments:

Post a Comment