संस्कृती माध्यमिक विद्यालय जळगाव येथे आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या पालखीसह दिंडीचे आयोजन करण्यात आले - MHL News

Breaking

Wednesday, 17 July 2024

संस्कृती माध्यमिक विद्यालय जळगाव येथे आषाढी एकादशी निमित्त विठुरायाच्या पालखीसह दिंडीचे आयोजन करण्यात आले

 


(महा.लोकसंवाद न्यूज)

प्रतिनिधी: जळगाव 

आज दि.१७/७/ २०२४ रोजी संस्कृती महाविद्यालय मेहरून जळगाव येथे आषाढी एकादशी निमित्त विठुरायांच्या पालखीसह दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून माननीय महापौर *सौ.जयश्री ताई महाजन यांनी विठू माऊलीच्या प्रतिमेचे पूजन तसेच पालखीचे पूजन केले. विद्यार्थ्यांनी विठू माऊली च्या तालावर तसेच ज्ञानोबा माऊली च्या गीतावर टाळ खेळत अवघा परिसर दुमदुमून टाकला, यात पालकांनीही सहभाग घेतला. विद्यार्थ्यांना फराळाचे वाटप करण्यात आले. *कार्यक्रमाप्रसंगी शाळेचे सर्व* *शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पालकही* *उपस्थित होते.*


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)

मो.9595755097

No comments:

Post a Comment