महा.लोकसंवाद न्यूज
प्रतिनिधी (वरणगाव)
भुसावळ तालुक्यातील शास्त्री विद्यालय पिंपळगाव बुद्रुक येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त ध्वजारोहण संस्थेचे जेष्ठ संचालक श्री मधुकर कोल्हे यांच्या हस्ते झाले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ संचालक श्री सुभाष सरोदे यांनी भुषवले. इयत्ता दहावी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन करण्यात आला रिया बावस्कर, ऋतुजा सरोदे, कृतिका पाटील, यश सरोदे धिरेन बेंडाळे, सोहम पाटील, वैष्णवी कृष्णा पाटील, सानिका पाटील, विनिका पाटील या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन गुणगौरव करण्यात आला. तसेच लोकमान्य टिळक पुण्यतिथी निमित्त वकृत्व स्पर्धेमध्ये भाग घेतलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा बक्षीस देण्यात आले. 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट दरम्यान क्रांती सप्ताह म्हणून साजरा करण्यात आला विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या देशभक्त आणि क्रांतिकारकांची माहिती दिली. कार्यक्रमासाठी संस्थेचे अध्यक्ष श्री बाबुराव सरोदे, सचिव पुंडलिक सरोदे, ज्येष्ठ संचालक सुरेश इंगळे, नारायण सरोदे उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका तडवी मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अश्विन कुमार इंगळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्रीमती पी टी पाटील, के आर पाटील, वाय ए भोळे ,संदेश पाटील ओम पाटील साई पाटील प्रदीप सरोदे, सुरज राणे, राहुल तोरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे माळी सर यांनी आभार मानले. आणि विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून कार्यक्रमाची सांगता झाली
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
मो.9595755097

No comments:
Post a Comment