जळगाव बिल्डिंग पेंटर् असोसिएशन चा वर्धापन दिन वरणगाव येथे मोठ्या थाटात साजरा - MHL News

Breaking

Tuesday, 6 August 2024

जळगाव बिल्डिंग पेंटर् असोसिएशन चा वर्धापन दिन वरणगाव येथे मोठ्या थाटात साजरा

 


महा.लोकसंवाद न्यूज! आज दि ६ ऑगस्ट रोजी वरणगाव ता. भुसावळ येथे हिंदी मराठी पत्रकार संघटनेच्या कार्यालयामध्ये जळगाव बिल्डिंग पेंटर असोसिएशन व हिंदू मुस्लिम एकता वेल्फेअर असोसिएशन या संघटनेचा वर्धापन दिन मोठ्या थाटात साजरा करण्यात आला 


सविस्तर माहिती अशी की जळगाव बिल्डिंग पेंटर असोसिएशन या संघटने कडून पेंटर लोकांच्या समस्या कशा सोडायच्या या संदर्भात येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असा की जिल्ह्यामधील पेंटर लोकांना संघटनेच्या माध्यमातून न्याय देण्याचा प्रयत्न व पेंटर आपली कला व कौशल्य दाखवून आपल्या जीवाची परवा न करता कामे करतात अशा पेंटर लोकांना संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या समस्या सोडवून त्यांना न्याय देण्याकरता संघटना मोठ्या प्रमाणात काम करेल यावेळी कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते त्यामध्ये जळगाव जिल्हा हिंदी मराठी पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष संजय भाऊ तायडे व प्रमुख उपस्थिती वरणगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भरत चौधरी साहेब उपस्थित होते यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले तसेच मनोगत व्यक्त करताना मनारखेड येथील सरपंच अजय इंगळे यांनी सांगितले पेंटर लोकांना शासनाकडून घरकुल योजनेचा लाभ मिळाला पाहिजे व काम करताना पेंटर लोकांच्या काही जीवाला बरे वाईट झाल्यास शासनाकडून त्यांना पन्नास लाखाची मदत म्हणून मिळाली पाहिजे अशा विविध समस्यांबाबत अजय इंगळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले यांनी यावेळी कार्यक्रमाला खालील मान्यवरांची उपस्थिती होती. प्रकाश सुरवाडे महा लोकसंवाद न्यूज मुख्य संपादक हिंदी मराठी पत्रकार संघटना जिल्हा उपाध्यक्ष व अनिल सुरवाडे जिल्हा कार्यालय प्रमुख प्रमोद बावस्कर तालुकाध्यक्ष हिंदी मराठी पत्रकार संघटना भुसावळ शेख अश्फाक बोदवड तालुका सचिव नितीन सुरवाडे जिल्हा प्रतिनिधी जी एस नाईन न्यूज जयराज पवार महा इंडिया न्यूज संपादक व मोठ्या प्रमाणात पेंटर लोक उपस्थित यावेळी सर्वांनी जेवणाचा आस्वाद घेतला अशाप्रकारे कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला 


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)

मो. 9595755097

No comments:

Post a Comment