बोदवड तालुक्यातील हरणखेड गावातील बेलदार समाजातील २९ कुटुंब घरकुल योजनेपासून वंचित. - MHL News

Breaking

Friday, 11 October 2024

बोदवड तालुक्यातील हरणखेड गावातील बेलदार समाजातील २९ कुटुंब घरकुल योजनेपासून वंचित.

 



भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटने चे मुख्यमंत्री यांना निवेदन 


महा.लोकसंवाद न्यूज 

जिल्हा प्रतिनिधी: जळगाव 


सविस्तर बातमी अशी 

बोदवड तालुक्यातील हरणखेड गावातील पंचायत समिती बोदवड मार्फत भटके विमुक्त बेलदार समाजातील २९ कुटुंब शासनाच्या घरकुल योजने पासून वंचित आहे वेळोवेळी संबंधित कर्मचारी अधिकारी ग्रामपंचायत सरपंच पंचायत समिती सदस्य सभापती आमदार व खासदार या सर्वांना साखळे घालून सुद्धा पुरातन काळापासून इंग्रजांच्या नंतर प्रथम ग्रामपंचायत झाल्यापासून आतापर्यंत या समाजातील एक व्यक्तीला सुद्धा घरकुल योजनेचा लाभ मिळालेला नाही सदर सर्व व्यक्ती लाभ घेण्यासाठी सर्व ग्रामीण पुढारी पदाधिकारी स्थानिक नेते यांच्या शब्दांवर विश्वास ठेवून आतापर्यंत निवाऱ्यासाठी घरकुल योजनेचे व समाज कल्याण मार्फत वसंतराव नाईक भटके मुक्त महामंडळ देखील डोळे झाक करत असून आतापर्यंत कोणत्याच योजनेतून लाभ मिळालेला नाही व भ्रष्टाचार विरोधी आक्रोश महाराष्ट्र राज्य भारत सरकार मान्यता प्राप्त या संघटनेच्या वतीने हरंनखेड गावातील बेलदार समाजातील व्यक्तींना न्याय मिळावा यासाठी जिल्हाधिकारी साहेब यांच्या हस्ते मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यात आले या निविदानात पुरातन काळापासून आतापर्यंत बेलदार भटके विमुक्त समाजातील२९ कुटुंबांना घरकुल योजनेचा त्वरित लाभ मिळावा व आतापर्यंत थेट ग्रामपंचायत ते पंचायत समिती व जिल्हा परिषद मुख्याधिकारी यांनी आतापर्यंत लक्ष दिले नाही व या सर्व प्रकरणाची चौकशी समितीने नेमून दोषीवर कारवाई करून त्वरित या कुटुंबांना घरकुल योजनेचा लाभ मिळेल यासाठी प्रयत्न व्हावे अशा प्रकारचे निवेदन देण्यात आले या जिल्हाधिकारी साहेब जळगाव व जिल्हा परिषद सि .ओ साहेब जळगाव समाज कल्याण अधिकारी साहेब जळगाव वसंतराव नाईक भटके मुक्त महामंडळ मुख्य अधिकारी साहेब जळगाव गटविकास अधिकारी साहेब बोदवड व निवेदनावरती घरकुल लाभापासून वंचित राहणारे कारण त्या गावाचे बेलदार समाजातील सर्व महिला व नागरिक यांच्या सह्या आहेत

प्रल्हाद किसन पांडे .गणेश प्रल्हाद पांडे. आशा गणेश पांडे .मंगेश योगेश पांडे. दिनेश प्रल्हाद पांडे. वैशाली दिनेश पांडे. लताबाई सुरेश पांडे .सागर सुरेश पांडे .रमेश विष्णू पांडे. बालाबाई रमेश पांडे. विकास रमेश पांडे. जनाबाई विष्णू. पांडे. काशिनाथ परशुराम पांडे. तुळशीराम काशिनाथ पांडे .पद्माबाई तुळशीराम पांडे .स्वप्नील तुळशीराम पांडे. रघुनाथ गणपत बेलदार. द्वारकाबाई रघुनाथ बेलदार .संतोष रघुनाथ बेलदार. आशाबाई संतोष बेलदार. गणेश रघुनाथ बेलदार .पूनम गणेश बेलदार .गजानन रघुनाथ बेलदार. शितल गजानन बेलदार .पंचफुला शांताराम बेलदार .ईश्वर शांताराम बेलदार . यांच्या सह्या आहे सर्व शासकीय योजनेच्या घरकुल योजनेपासून वंचित असणाऱ्या सर्वांच्या सह्या या निवेदनावरती आहे व येणाऱ्या काळात लवकरच घरकुल योजनेचा लाभ न मिळाल्यास शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत मुख्यमंत्री साहेबांना देण्यात आले.


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे 

मो. 9595755097

No comments:

Post a Comment