महा.लोकसंवाद न्यूज
प्रतिनिधी: वरणगाव ता.भुसावळ
सविस्तर वृत्त असे की आज दिनांक ९ बुधवार रोजी भुसावळ मतदार संघाचे आमदार श्री. संजय सावकारे यांच्या हस्ते आचेगांव येथे बुद्ध विहाराचे भुमीपुजन करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की आमदार श्री.सजय सावकारे हे आज संध्याकाळी आचेगांव येथे आपल्या ताफ्या सह आले व सर्व प्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
त्यानंतर बुद्ध विहाराच्या नियोजित जागेवर पाहणी करून व गावातील बौद्ध समाज बांधव यांच्यासोबत चर्चा केली त्या नंतर आमदार संजय भाऊ यांनी नारळ फोडुन व फित कापून उद्घाटन व भुमीपजन केले.
यावेळी येथे सरपंच सौ मनीषा ताई झांबरे उपसरपंच दिपक पाटील ग्रामपंचायत सदस्या कल्पना ताई चौधरी माजी सरपंच राजेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस नरेंद्र पाटील भाजपा तालुकाध्यक्ष प्रशांत पाटील भाजपा तालुका सरचिटणीस आकाश झांबरे आशिष चौधरी व भाजप शाखा अध्यक्ष बबलू कोळी पत्रकार प्रकाश सुरवाडे पत्रकार संदीप सुरवाडे व येथील समाज बांधव आधार सुरवाडे राहुल सुरवाडे आणि सर्व समाज बांधव उपस्थित होते यावेळी सर्व समाज बांधव यांनी खूप वर्षाचा प्रलंबित बुद्ध विहाराचा प्रश्न मार्गी लावल्यामुळे आमदार संजय सावकारे यांचे आभार मानले तसेच गावातील सरपंच उपसरपंच यांनी प्रयत्न केले त्यांचे सुद्धा मनापासून आभार मानले.
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो. 9595755097

No comments:
Post a Comment