महा.लोकसंवाद न्यूज
प्रतिनिधी: बोदवड
सविस्तर वृत्त असे की आज दिनांक १२/१०/२०२४ रोजी गोळेगाव ता.बोदवड येथे बुद्ध मूर्तीची स्थापना रोहीणीताई खडसे यांच्या हस्ते करण्यात आले.
याबाबत माहिती अशी की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार) गटातर्फे जनसंवाद यात्रेनिमित्त रोहिणी ताई खडसे यांचे आज गोळेगाव येथे आगमन झाले त्यानिमित्ताने येथे त्यांच्या हस्ते बुद्ध मूर्तीची स्थापना झाली यावेळी रोहिणी ताई खडसे
यांनी बोलताना सांगितले माझी उमेदवारी मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघांमध्ये पक्की झाली असून येथील उमेदवार मीच असुन आपण सर्वांनी माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे जेणेकरून मी आमदार झाल्यानंतर आपल्या गावच्या सर्व समस्या सोडवू शेकेल या वेळी रोहिणी ताई यांनी सर्व गावकरी यांना दसरा विजयादशमी व धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या
या कार्यक्रमांमध्ये बोदवड पं स चे माजी सभापती किशोर गायकवाड यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले तसेच बोदवड तालुका अध्यक्ष आबा पाटील माजी जिल्हा परिषद सदस्य रामदास पाटील यांनी सुद्धा आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी गावातील नागरिक निखिल पाटील गणेश सुरवाडे गोलू पाटील प्रवीण बेलदार किशोर सुरवाडे श्रेयस पाटील कृष्णा पाटील यौगेश सुरवाडे प्रशांत पाटील निलेश पाटील शुभम पाटील सोहम इंगळे आणि गावातील बौद्ध बंधू भगिनी उपस्थित होते
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो. 9595755097

No comments:
Post a Comment