महा.लोकसंवाद न्यूज
तालुका प्रतिनिधी: भुसावळ
सविस्तर बातमी अशी आज दिनांक १४ ऑक्टोंबर धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त नागपूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दर्शनासाठी व अभिवादन करण्यासाठी गेलेल्या भाविकांना भोजनदान करण्यात आले.
याबाबत असे की धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त नागपूर दिक्षाभुमी येथे हजारो भाविक पुर्ण महाराष्ट्र आणि देशातुन जात असतात त्यांच्यासेवेसाठी हिंदी मराठी पत्रकार संघटना तर्फे भोजन दान जगनभाई सोनवणे संविधान आर्मी राष्ट्रीय अध्यक्ष यांच्या हस्ते अन्न दान कार्यक्रम करण्यात आला.
याप्रसंगी हिंदी मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष संजय तायडे जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश सुरवाडे जिल्हा संघटक युवराज तायडे जिल्हा कार्यालय प्रमुख अनिल सुरवाडे नितीन सुरवाडे जिल्हा प्रतिनिधी जी एस नाईन न्यूज राजु शेजोळे बोदवड ता अध्यक्ष हे उपस्थित होते
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो. 9595755097

No comments:
Post a Comment