स्मारकासाठी चाळीसगांव न.पा. च्या हालचालींना वेग.
महा.लोकसंवाद न्यूज
प्रतिनिधी: चाळीसगाव
सविस्तर बातमी अशी की
बहुचर्चित व 5 वर्षापासून प्रलंबित असलेले विश्वभुषण डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती स्मारकाच्या बाबत होणाऱ्या दिरंगाई च्या निषेधार्थ आज दिनांक 14 ऑक्टोबर 2024 रोजी समता सैनिक दल चाळीसगांव शाखेने रेल्वेस्टेशन येथे धरणे आंदोलन आयोजित केले होते.
या आंदोलनाचे नेतृत्व राज्य अध्यक्ष मा.धर्मभुषण बागुल यांनी केले. दै.ग्रामस्थचे संपादक व ओबीसी नेते मा.किसनराव जोर्वेकर , संभाजी सेनेचे अध्यक्ष बापुसाहेब शिरसाठ ,सदानंद चौधरी ,जितेंद्र वाघ ,रामचंद्र जाधव ,गौतम जाधव ,संभा आप्पा जाधव , रमेश सोनवणे , सदानंद चौधरी, बापूराव पवार गुरुजी, खुशाल पाटील, अरविंद पाटील ,अप्पीभाई मिर्झा,भैय्यासाहेब ब्राम्हणे,सुजित जाधव,भैय्या जगताप,गोविंद सोनवणे ई .ज्येष्ठ मंडळींनी सहभाग घेतला. त्याच प्रमाणे पत्रकार प्रशांत गायकवाड,सूर्यकांत कदम , महेंद्र सुर्यवंशी, खेमराज कुमावत , जीवन जाधव ,विजय गायकवाड अमन पटेल यांनी देखील उपस्थिती दिली.
आंदोलनाचे निमंत्रक महेंद्र जाधव (तालुकाध्यक्ष), विशाल पगारे (शहराध्यक्ष) , युवा नेतृत्व अवधेश बागुल , धनंजय अहिरे हे होते.
आंदोलनाचे आयोजन भाईदास गोलाईत , नाना घोडेस्वार , मनोज जाधव सदाशिव कदम , रवींद्र अहिरे ,महेंद्र निकम , शिवाजी शिंदे ,नाना शिरसाठ, सौ.कल्पना शेजवळ , सौ. लता आमले, सौ.आशा अंबोरे ,राजेंद्र जाधव ऊपखेड, विनोद निकम , भगवान मोरे , अमोल पगारे यांनी केले होते.
विशेष सहकार्य - विष्णू जाधव (बाबा मंडप व डेकोरेटर्स ) यांनी आंदोलनासाठी विशेष सहकार्य केले.
समता सैनिक दलाचे ज्येष्ठ कार्यकर्ते शरद जाधव , पितांबर झाल्टे , संजय बाविस्कर , वसंत मरसाळे,राजरत्न मोरे , सूपडू जाधव ,किरण मोरे, अनिल महिराळे, विलास चव्हाण, सागर निकम , शशी जाधव , जितु महाले, मुकेश बागुल, बंटी जाधव, अजय जाधव , उमेश जाधव, तुकाराम आंबोरे, गणेश अहिरे , हेमराज अहिरे ,अजय सोनवणे, नितीन जवराळे,स्वप्नील मोरे,नेहा राठोड, गोपाल भालेराव, अक्षय सोनवणे ,सम्राट जाधव यांनी पूर्णवेळ आंदोलनात भाग घेतला.
मुख्याधिकारी मा.सौरभ जोशी ,नपाचे इंजिनिअर सचिन कुमावत , ज्येष्ठ कर्मचारी दीपक देशमुख यांनी आंदोलनास भेट दिली.सविस्तर चर्चा केली झालेली चर्चा - नियोजित स्मारकाची जागा रेल्वे स्टेशन जवळ असल्याने रेल्वे विभागाचा ना हरकत दाखला मागविण्यात आला आहे.तसे पत्र आजच पाठविण्यात आले आहे.
सदर दाखला प्राप्त होताच , आरक्षित जागेचे आरक्षण बदलविण्याचा प्रस्ताव शासनाला पाठविला जाईल.तशी मंजुरी आल्यास स्मारकाचे कामास सुरुवात केली जाईल अशी माहिती मुख्याधिकाऱ्यांनी दिली. व आंदोलन थांबविण्याची विनंती केली
मुख्याधिकारी नुकतेच रुजू झाले आहेत त्यांना याबाबत थोडा कालावधी दिला पाहिजे.म्हणून आजचे धरणे आंदोलन तूर्त स्थगित करण्यात आले आहे
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो. 9595755097

No comments:
Post a Comment