महा.लोकसंवाद न्यूज
जिल्हा प्रतिनिधी: जळगाव
भुसावळ येथील रहिवासी उल्हास भगवान सणांसे माजी सेवानिवृत्त प्रिन्सिपल श्री. भगवान गंगाधर सणांचे यांचे सुपुत्र उल्हास भाऊ यांनी कंपनीमध्ये केलेल्या चांगल्या कामाचे वरिष्ठांनी त्यांना उत्कृष्ट काम केल्याबद्दल व कंपनीच्या चांगल्या विविधरित्याने कामाचे व एक वेगळ्या पद्धतीने सेवा बजावीत असताना उल्हास भाऊंनी सर्वांचे मनः जिकून वरिष्ठांचा जो विश्वास संपादन केला त्याबद्दल त्यांचे वरिष्ठांनी त्यांना गोल्ड मेडल देऊन सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
त्याबद्दल लोहार समाजातील एक चांगली व्यक्ती व समाजासाठी एक नवीन दिशा समाज विकासाच्या दिशेने पाऊल उचलत आहे त्याबद्दल त्यांचे समाज बांधवांकडून सर्वपरी अभिनंदन होत आहे व ते स्वतः विश्वकर्मा संस्थेचे सहसचिव असून त्यांच्याकडून व सर्व समाज बांधवांकडून त्यांना अभिनंदन व शुभेच्छा देण्यात येत आहे .
अखिल भारतीय विश्वकर्मा बारा बलुतेदार वेल्फेअरचे उत्तर महाराष्ट्राचे विभागीय अध्यक्ष रामेश्वर लोहार व सर्व कार्यकारणी व सर्व सदस्य यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत तसेच भ्रष्टाचार विरोधी आक्रोश संघटनेचे जिल्हाध्यक्ष व सर्व कार्यकारणी व सर्व सदस्य यांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या
समाजामध्ये असे नवीन होतकरू नीती नियम धर्म व स्वतःच्या हिमतीवर मेहनतीवर विश्वासावर काम करणाऱ्या उल्हास भाऊ यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन सर्व स्तरातून होत आहे.
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक: प्रकाश सुरवाडे मो.9595755097

No comments:
Post a Comment