महा.लोकसंवाद न्यूज
प्रतिनिधी वरणगाव ता.भुसावळ
वरणगाव येथील एका नामांकीत व्यापाऱ्याने अल्पवयीन मुलीचा मोटर सायकलवरून घरी सोडण्याच्या बाहण्याने तीला गाडीवर बसून अंधाराचा फायदा घेऊन तीचा विनयभंग केल्याची घटना दि .१० रविवार रोजी घडली.
दरम्यान या व्यापाऱ्यावर वरणगाव पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या बाबत वरणगाव पोलीसांनी दिलेल्या माहीती नुसार असे . की शहरातील एक प्रसिद्ध श्री मॉलमध्ये पिडीत अल्पवयीन मुलगी कामाला होती. सदर रविवार दि १० रोजी रात्रीच्या नऊ वाजेच्या वेळेस सदर अल्पवयीन मुलगी सोबत काम करणारी दुसरी मुलगी तिच्या वडिलांना सोबत मोटारसायकल वर तिघे घरी जात असताना श्री मॉलचे मालक
राजेद्र जैन हे त्याच वेळी मोटर सायकल घेऊन पाठमागुन येवुन त्यांची गाडी थांबवली व म्हणाले मला तिकडे जायचं आहे असे पिडीत अल्पवयीन मुलीला सागून आपल्या मोटर सायवलवर बसविले व थोड्या अंतरावर अंधार असलेल्या ठिकाणी गाडी थांबवली व अल्पवयीन मुलीचा हात धरून तिची छेड काढीत तीला लज्जा उत्पन्न होईल असे कृत केले. सदर मुलगी दुसऱ्या दिवशी कामावर न गेल्याने तिच्या आईने विचारले असता घडलेला प्रकार तीने आईला सांगीतला. त्यानंतर तिच्या आईने वडिलांना सांगितला त्यानंतर आई मुलगी व वडील पोलीस स्टेशनला जाऊन राजेंद्र जोहरीलाल जैन यांच्या विरोधात पिडीत मुलीच्या फिर्यादीनुसार पोक्सो अर्तगत गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनेचा तपास सहायक पोलिस निरिक्षक जर्नाधन खडेराव हे करीत आहे.
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मुख्य संपादक. प्रकाश सुरवाडे
मो 9595755097

No comments:
Post a Comment