महा.लोकसंवाद न्यूज (जळगाव)
मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)
बोदवड जिल्हा जळगाव येथे सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा तर्फे येथे तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षणीय उपोषण
सविस्तर माहिती अशी की
मस्साजोग जि. बीड येथील सरपंच स्व. संतोष देशमुख यांची निघृणपणे अतिशय कुर पध्दतीने हत्या करण्यात आली सदर घटनेचे पडसाद हे संपुर्ण महाराष्ट्रातील जन सामान्य जतनेच्या मनात उमटले असून सदर घटनेचा सकल मराठा समाजाच्या वतीने आम्ही जाहिर निषेध करत असून सदर घटनेने सर्व आरोपी यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी तसेच सदर खटला हा फास्टट्रॅक कोर्टात्त चालवण्यात यावा, आरोपी वाल्मीक कराड यांची पार्श्वभूमी बघता सदर संपुर्ण खटला हा अंडर ट्रायल चालवण्यात यावा व वाल्मीक कराड यास जामिनावर सौडण्यात येऊ नये, वाल्मीक कराड यांच्या प्रॉपर्टीची चौकशी करण्यात यावी तसेच सातत्याने सदर घटने संवभत्ति मंत्री धनंजय मुंडे यांचे नाव चर्चेत येत असून मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनामा घेण्यात यावा
तसेच संतोष देशमुख यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय सेवेमध्ये समाविष्ट करण्यात यावे.
बोदवड तालुका सकल मराठा समाज व मराठा क्रांती मोर्चा मार्फत तर्फे तहसीलदार बोदवड
यांना करण्यात आली
यावेळी मोर्चा मध्ये बोदवड नगरपंचायत चे नगर अध्यक्ष श्री आनंदा पाटील जनसेवक विनोद पाडर सागर पाटील शेलेश वराडे निळकंठ पाटील व मोठ्या प्रमाणात लोक उपस्थित होते
उपोषण ठिकाणी येथील तहसीलदार यांनी भेट देऊन उपोषणाची सांगता केली
जाहिरात व बातम्या साठी संपर्क मो.९५९५७५५०९७

No comments:
Post a Comment