बोदवड येथील उपोषणकर्त्यांना प्रांताधिकारी यांची भेट - MHL News

Breaking

Tuesday, 28 January 2025

बोदवड येथील उपोषणकर्त्यांना प्रांताधिकारी यांची भेट

 


महा.लोकसंवाद न्यूज 

बोदवड (प्रतिनिधी)


बोदवड येथील पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणास बसलेले मानमोडी ग्रामस्थांना दिली प्रांताधिकारी यांनी भेट 


याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी उपोषणास बसलेले मानमोडी येथील ग्रामस्थ सरपंच हे आमरण उपोषण करत असून मानमोडी तालुका बोदवड येथील पाणीपुरवठा योजनेमध्ये भ्रष्टाचार झालेला असून ज्या अधिकाऱ्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून कारवाई मध्ये दोषी आढळल्यास त्यांच्यावर गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी येथील सरपंच ग्रामस्थ उपोषणास बसलेल्या आहे 


सदर आज दिनांक 28 जानेवारी रोजी भुसावळ येथील प्रांत अधिकारी जितेंद्र पाटील यांनी भेट दिली असून त्यांनी तोंडी आश्वासन दिलेले आहे की सदर चौकशी करून जे कोणी अधिकारी यात दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल

No comments:

Post a Comment