शिरसाळा तालुका बोदवड येथील बोगस घरकुलांची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी - MHL News

Breaking

Sunday, 26 January 2025

शिरसाळा तालुका बोदवड येथील बोगस घरकुलांची चौकशी होऊन कारवाई करण्याची मागणी

 


महा.लोकसंवाद न्यूज (जळगाव)

मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)


आज दिनांक २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी बोदवड पंचायत समिती समोर

शिरसाळा तालुका बोदवड येथील बोगस प्रधानमंत्री आवास मोदी आवास घरकुलांची चौकशी होऊन कारवाई होण्याबाबत आमरण उपोषण सुरू 


याबाबत सविस्तर माहिती अशी की बोदवड तालुक्यातील शिरसाळा या गावी प्रधानमंत्री आवास मोदी आवास योजना २०२३/२४ ते २०२५ या वर्षांमधील लाभार्थी निवड करताना ग्रामसेवक संतोष करवते यांनी एकाच कुटुंबातील दोन दोन व्यक्तींना घरकुलांचा लाभ दिला यातील घरकुल मंजूर लाभार्थीचे पक्के सिमेंट विटा आरसीसी चे बांधकाम केलेल्या व्यक्तींना सुद्धा घरकुलाचा लाभ दिला 


त्याचप्रमाणे ज्या लाभार्थ्यांनी घरकुलांचे बांधकाम न करता एक ही वीट घराला न लावता विकी पाटील गृहनिर्माण अभियंता पंचायत समिती बोदवड यांनी बनावट जिओ ट्रॅग करून फोटो सादर केले व लाभार्थ्यांकडून चिरीमिरी घेऊन घरकुल पूर्ण केल्याचे दाखवले व ग्रामसेवक संतोष करवते घरकुलाचे बांधकाम पूर्ण न करता त्यांना नमुना नं ८ चा उतारा दिला घरकुल मंजुरीसाठी नमुना नंबर ८ मध्ये बदल करून बनावट उतारे सादर करून बनावट घरकुल मंजुरीला हातभार लावला सन २०२३/ २४ व २०२४/ २५ या वर्षात जेवढे घरकुल मंजूर झालेले आहे त्यांनी खरोखरच घरकुलाचे बांधकाम पूर्ण केलेले आहेत का याची स्थळ निहाय पंचनामा करून चौकशी करण्यात यावी जे खरे पात्र लाभार्थी गरजू लाभार्थी असतील अशांना ग्रामसेवकाने लाभ दिला नाही व धन दांडगे ट्रॅक्टर वाले बागायती वाले शेतकरी पक्के घरा वाले यांना घरकुलाचा लाभ मिळण्यास ग्रामसेवक करवते यांनी मदत केली आहे


या सर्व गैरप्रकाराची व नियमबाह्य घरकुलांची तात्काळ चौकशी करावी अशी मागणी उपोषण कर्त्य श्री. पुंडलिक कृष्णा पाटील यांनी केले आहे 


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मो.९५९५७५५०९७

No comments:

Post a Comment