गरीब शोषित श्रमिक समाज संघर्ष समिती बोदवड यांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन - MHL News

Breaking

Tuesday, 18 February 2025

गरीब शोषित श्रमिक समाज संघर्ष समिती बोदवड यांचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन

 


महा.लोकसंवाद न्यूज (जळगाव)

मुख्य संपादक (प्रकाश सुरवाडे)


आज दिनांक १८ मंगळवार रोजी बोदवड येथील तहसीलदार यांना गरीब शोषित श्रमिक समाज संघर्ष समिती बोदवड या संघटनेच्या माध्यमातून निवेदन देण्यात आले.


सदर संघटनेने खालील प्रमाणे मागण्या केल्या आहे


१)वाढता भ्रष्टाचार बेरोजगारी यांचा जाहीर निषेध

२) मोठ्या प्रमाणात वाढलेल्या भ्रष्टाचारामुळे महागाई बेरोजगारी व गुन्हेगारी वाढवून कायद्याची पायमल्ली होत आहे 

३) कोणत्याही दुकानदाराने ग्राहकांना योग्य दरात माल(साहित्य)व सेवा देवुन न मागता पक्के बिल द्यावे 

४) दारिद्र्य रेपा प्रमाणे श्रीमती रेपा अर्थात संपत्ती जमवण्याची मर्यादा ठरवण्यात यावी व त्याचा सर्वे करण्यात यावा 

५) शासकीय कर्मचारी अधिकारी ठेकेदार राजकारणी व त्यांचे कार्यकर्ते यांच्या कडुन मत्ता व दायित्वाचे फार्म भरून घ्यावे व फार्म भरून न देणाऱ्यावर कठोर कारवाई करावी 

६) देशात व राज्यात आर्थिक आणीबाणी घोषित करून बेहिशोबी मालमत्ता शासनाकडे जमा करावी 

७) लोकशाहीमध्ये न्याय मागण्यासाठी न्यायालय हे शेवटचा पर्याय आहे म्हणून न्याय अति जलद गतीने देण्यात यावा 

८) अती जलद गतीने न्याय मिळवण्यासाठी शासनाने उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची संख्या वाढवण्यात याव्या 

९) न्यायाधीशांची अधिकाऱ्यांची व कर्मचाऱ्यांची संख्या पुरेशा प्रमाणात वाढवण्यात याव्या व यासाठी लागणारी साधन सामृगीची व्यवस्था ही करण्यात यावी

१०) न्यायाधीशांची निवड युपीएससी मार्फत करण्यात यावी

११) न्यायाधीश व इतर अधिकारी कर्मचारी भरतीत एससी एसटी व ओबीसी यांच्या आरक्षणाची तरतूद करण्यात यावी 

अशा प्रकारच्या मागण्या संघटने कडून करण्यात आले आहे. 

यावेळी संघटने कडून निवेदन देताना संघटनेचे.अध्यक्ष बी डी इंगळे सर उपाध्यक्ष इंजिनियर महासेन सुरडकर राजेश बोदडे पत्रकार अक्रम शेख अशोक तायडे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हजर होते 


जाहिरात व बातम्या साठी संपर्क मो.९५९५७५५०९७

No comments:

Post a Comment