विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती आचेगाव येथे उत्साहात साजरी - MHL News

Breaking

Monday, 14 April 2025

विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 134 वी जयंती आचेगाव येथे उत्साहात साजरी

 


महा.लोकसंवाद न्यूज 

मुख्य संपादक(प्रकाश सुरवाडे)


आज दिनांक 14 एप्रिल रोजी विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आचेगाव ता.भुसावळ येथे मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली 


सर्व प्रथम येथील ग्रामपंचायत कार्यालया मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नगर येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास भगवान गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले त्यानंतर येथील मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून मानवंदना देण्यात आली व त्यानंतर येथे लहान विद्यार्थ्यांना वह्या आणि पेन यांचे वाटप करण्यात आले 



यावेळी येथे प्रमुख उपस्थिती सरपंच कल्पनाताई चौधरी उपसरपंच दीपक पाटील ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पाटील ग्रामपंचायत सदस्या प्रतिभाताई पाटील माजी सरपंच मनिषा ताई झांबरे ग्रामसेवक महेंद्र तायडे साहेब तसेच येथील पोलीस पाटील गोकुळ पाटील सामाजिक कार्यकर्ते आशिष चौधरी पत्रकार प्रकाश सुरवाडे ग्राम रोजगार सेवक शाहरुख खान शिपाई अरुण चौधरी सर्व अंगणवाडी सेविका मदतनीस जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिका मॅडम अतुल पाटील सर भीम जयंती उत्सव समिती अध्यक्ष समाधान सुरवाडे उपाध्यक्ष विकास सुरवाडे सचिव आधार सुरवाडे अक्षय वानखेडे विश्वास सुरवाडे प्रणव सुरवाडे राहुल सुरवाडे नितेश सुरवाडे गोकुळ सुरवाडे व सर्व महिला पुरुष समाज बांधव उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सुरवाडे यांनी केले कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला

No comments:

Post a Comment