लोकसभा असेल किंवा विधानसभा असेल राजकीय चौकटीमध्ये जळगाव जिल्ह्याची चर्चा ही नेहमीच अग्रेसर ठरत असते. त्यामध्ये बऱ्याच महाभागाने असे सूर लावले होते की उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या खऱ्या शिवसेनेचे जळगाव जिल्ह्यातून प्रस्थच संपलेले आहे असे तारे तोडणारे ही भरपूर आले आणि सर्व सामान्य चर्चा सत्रांमध्ये उद्धव साहेबांच्या खऱ्या शिवसेनेचे गट संपल्याचे खोटे चित्र रंगवण्याचे खोटे प्रयत्न केले होते. परंतु आज दिनांक 27 मे रोजी उद्धव साहेबांच्या आदेशाने शिवसेनेचे शहेनशहा, हर सवाल का एक ही जवाब, आदरणीय संजयजी राऊत साहेबांनी निष्ठावंत कार्य कर्त्यांचे पद जाहीर करण्याचे संकेत दिले. त्यात प्रामुख्याने लोकसभेचे संपर्क प्रमुख आदरणीय विजय परब साहेब यांच्या माध्यमातून एकनिष्ठ असलेल्या शिव सैनिकांना मुंबईला बोलावून घेतले आणि संघटन मजबुती चे मार्गदर्शन करून संबंधित शिलेदारांना कामाला लागण्याचे आदेश दिले. दोन-चार विद्यार्थी शाळा सोडून गेले म्हणून ती शाळा ओस पडत नसते,तर परत जून मध्ये ते फुल भरत असते या शब्दात साहेबांनी कार्यकर्त्यांना. मार्गदर्शन केले. ह्या वेळेस मुक्ताईनगर च्या रखडलेल्या विकास कामांसाठी कटिबद्ध असलेले इच्छापुर निमखेडी( कुऱ्हा) विभागाचे, डॅशिंग, हसतमुख नेतृत्व माननीय बाबुराव बोन्डे यांना आदरणीय विजय परब साहेबांच्या हस्ते संजय राऊत साहेबांच्या आदेशाने तालुका पद बहाल केले. यावेळेस पाहणाऱ्यांच्या चेहऱ्यावरती खऱ्या शिवसेनेची झलक नजर येत होती. पुढील पदांच्या वाटाघाटी ह्या येत्या 30 तारखेला जळगाव मधुन होणार असुन होणाऱ्या नवनिर्वाचित कार्यकर्त्यांमध्ये आजपासूनच भगव्या वातावरणाची मशाल धगधगत असल्याचे वातावरण दिसत होते. लवकरच मुक्ताईनगरचे वातावरण भगवामय होणार असून सर्व सामान्यांना न्याय मिळण्याचे संकेत दिसत आहेत. या वेळेस कीर्तनकार आदरणीय संतोष जी चिकटे महाराज, चित्रपट माया ममता चे प्रोडूसर डायरेक्टर विशाल वाघ, आदरणीय साहेबराव गटे, युवा संघटन मध्ये धडाडीचे कार्यकर्ते शिवाजी भास्कर लोणे आणि आणि मुक्ताईनगर चे प्रमुख प्रसिद्ध चित्रकार अभिषेक बाबुराव बोंडे, तसेच मुंबई स्थित शिवसैनिक राजू माने उपस्थित असुन जून पासून जळगाव जिल्ह्यात मशाल मुक्ताईनगर पासून धडाडणार एवढे मात्र नक्कीच....

No comments:
Post a Comment