आज दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले व महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बोदवड तहसील कार्यालयासमोर गरीब शोषित श्रमिक समाज संघर्ष समिती तर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले
याबाबत अधिक माहिती अशी बोदवड येथे आज दिनांक 11 एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले व युगपुरुष महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बोदवड तहसील कार्यालयासमोर गरीब शोषित श्रमिक समाज संघर्ष समिती तर्फे एक दिवसीय धरणे आंदोलन करून तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले निवेदनात या खालील प्रमाणे मागण्या करण्यात आल्या आहेत.
प्रत्येक साठ वर्षे पूर्ण झालेल्या नागरिकांना दरमहा दहा हजार रुपये पेन्शन देण्यात यावी यासाठी श्रावण बाळ संजय गांधी लाडकी बहीण इतर योजनांचे मानधन देखील दहा हजार रुपये करण्यात यावे
पदवीधर बेरोजगारांना सुद्धा दहा हजार रुपये बेरोजगार भत्ता देण्यात यावा
दरवर्षी दोन कोटी प्रमाणे बारा कोटी बेरोजगारांना रोजगार देण्यात यावा
वीज दरवाढ रद्द करून राज्यात 200 युनिट पर्यंत विज बिल माफ करण्यात यावे
पाणीटंचाई असलेल्या गावांना शहरांना पाणीपट्टी माफ करण्यात यावी घरपट्टी व नळ पाणीपट्टीवरील व्याजदर रद्द करण्यात यावा (जसे बोदवड शहरात आकारले
शासकीय दवाखान्यात पुरेशी यंत्र सामुग्री ब्रँडेड औषधी व कर्मचारी पुरवण्यात यावे
खाजगी वैद्यकीय सेवे मध्ये बेसुमार वाढलेले महागाई नियंत्रणात ठेवण्यात यावी
केंद्राप्रमाणे राज्यातील सेवानिवृत्त शासकीय निम शासकीय कर्मचाऱ्यांना वैद्यकीय बिल देण्यात यावे
एसटी बसची केलेली भाडेवाढ रद्द करण्यात यावी
बेघर कुटुंबांना शासनातर्फे 500 स्केअर फुट जागा देण्यात यावी शहरी व ग्रामीण असा भेदभाव न करता घरकुल योजने करता सरसकट पाच लाख रुपये मंजूर करण्यात यावे
शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचार मुक्त व भयमुक्त करण्यात यावे
भ्रष्टाचाराला देशद्रोहाचा गुन्हा घोषित करून गुन्हेगाराला कडक शिक्षा करण्यात यावी
न्यायालयात न्यायदानाचे काम जलद गतीने व भ्रष्टाचार मुक्त करण्यात यावे
अशा प्रकारच्या मागण्या निवेदनात करण्यात आलेल्या आहे
निवेदनावर खालील कार्यकर्त्यांच्या सही आहे
बिडी इंगळे सर अध्यक्ष इंजिनीयर महासेन सुरळकर उपाध्यक्ष
महेंद्र गायकवाड राजेश बोदडे संजय तायडे पत्रकार प्रकाश सुरवाडे किशोर इंगळे संदीप सुरवाडे अशोक तायडे विचवा अक्रम शेख

No comments:
Post a Comment