आज दिनांक 2 जून 2025 रोजी अल्पबचत भवन, जळगाव येथे जिल्हाधिकारी श्री आयुष प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिन संपन्न झाला.
या लोकशाही दिनात विविध शासकीय विभागांशी संबंधित एकूण 95 अर्ज नागरिकांकडून प्राप्त झाले.
कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी श्री गजेंद्र पाटोळे, तहसीलदार डॉ. उमा ढेकळे (संजय गांधी योजना), नायब तहसीलदार श्री राहुल सोनवणे (करमणूक शाखा) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
नागरिकांनी आपल्या विविध समस्या व अडचणींबाबत अर्ज सादर केले.
प्रत्येक अर्जाचा विभागवार आढावा घेऊन, त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
लोकशाही दिनाच्या माध्यमातून नागरिकांच्या अपेक्षा, समस्या आणि तक्रारींवर प्रभावी उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला जात आहे.
लोकशाही दिन म्हणजे शासन आणि नागरिक यांच्यातील संवादाचा महत्त्वाचा दुवा – जिथे प्रत्येक आवाज ऐकला जातो.

No comments:
Post a Comment