महा लोकसंवाद न्यूज प्रतिनिधी (जळगाव)
संस्कृती महाविद्यालय मेहरून जळगाव येथे स्वतंत्र दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लिनेस क्लबच्या अध्यक्ष सौ रेशमाजी बेहेराणी मॅडम तसेच ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी विजयाताई बाफना मॅडम तसेच जय दुर्गा महिला फाउंडेशनच्या अध्यक्ष, जळगाव नगरीच्या माजी महापौर सौ.जयश्रीताई महाजन आणि कृ.उ.बा.समितीचे माजी अध्यक्ष श्री.ज्ञानेश्वर दादा नाईक हे लाभले होते.विद्यार्थ्यांनी भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या घोषणा देत अवघा परिसर दुमदुमवून टाकला.कार्यक्रमाची सुरुवात ध्वज पूजनाने करून प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.शाळेतील बालगोपाल विद्यार्थ्यांनी विविध नेत्यांच्या वेशभूषा करून कार्यक्रमाला शोभा आणली.पाहुण्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित केला.कार्यक्रमांतर्गत विविध स्पर्धांमधील प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी जल्लोषात आणि उत्साहात देशभक्तीपर गीत गायन , नृत्य तसेच भाषणे सादर केली. कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

No comments:
Post a Comment