जामनेर तालुक्यात जमावाच्या मारहाणीत एका अल्पसंख्यांक युवकाचा मृत्यू कठोर कारवाईची मागणी - MHL News

Breaking

Wednesday, 13 August 2025

जामनेर तालुक्यात जमावाच्या मारहाणीत एका अल्पसंख्यांक युवकाचा मृत्यू कठोर कारवाईची मागणी

 


महा लोकसंवाद न्यूज/जळगाव 

जामनेर तालुक्यातील बेटावद खुर्द या गावात जमावाच्या मार हानीत एका अल्पसंख्यांक युवकाचा मृत्यू झाला 


त्यासंदर्भात बोदवड येथे दि.13 ऑगस्ट रोजी मुस्लिम सेवा संघ यांच्या वतीने तहसीलदार बोदवड यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहे की या घटनेमधील तरुणाला जमावाने मृत्यू होईपर्यंत बेदम मारहाण केली सदर या घटनेचा निषेध करण्यात आला आणि या घटनेची चौकशी करून आरोपीवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली 


यावेळी निवेदन देताना शेख अक्रम बी डी इंगळे सर राजेश बोदडे महासेन सुरळकर शाहरुख खान उपस्थित होते

No comments:

Post a Comment